ICC T20 World Cup 2026 R Ashwin On Pakistani Usman Tariq : टी-२० वर्ल्ड कप २०२६मध्ये पाकिस्तानचा फिरकीपटू उस्मान तारिक पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. USA विरुद्ध सर्वाधिक ३ विकेट्स घेत त्याने संघाला विजय मिळवून दिला; मात्र त्याच्या गोलंदाजी अॅक्शनवर पुन्हा ‘फेकी’चे आरोप होत आहेत. सोशल मीडियावर तो 'फेकी' गोलंदाज आहे, अशी चर्चा रंगताना दिसत आहे. या मुद्यावरुन भारताचा माजी क्रिकेटर श्रीवत्स गोस्वामी आणि भारताचा माजी फिरकीपटू रविचंद्रन अश्विन यांच्यात सामना रंगल्याचे पाहायला मिळाले. आर. अश्विन याने पाकिस्तानी गोलंदाजाची बाजू घेत माजी क्रिकेटरला सुनावले आहे. नेमकं तो काय म्हणाला? जाणून घेऊयात सविस्तर
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
ICC नं क्लीन चीट दिली, पण पाकिस्तानी गोलंदाजावर आता पुन्हा 'फेकी'चा आरोप
ग्रुप A मधील USA विरुद्धच्या सामन्यात उस्मान तारिकने ३ विकेट्स घेत पाकिस्तानला ३२ धावांनी विजय मिळवून दिला. मात्र सामन्यानंतर तो पुन्हा एकदा नियमबाह्य गोलंदाजी करत असल्याचे आरोप त्याच्यावर होता. आहेत. याआधी ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेदरम्यानही तो या वादात अडकला होता. ICC ने त्याला क्लीन चीट दिल्यानंतर तो आता पुन्हा मैदानात उतरला आहे. पण तरीही काही क्रिकेट चाहत्यांना त्याच्या गोलंदाजीत गडबड वाटते. त्यामुळेच पुन्हा त्याची गोलंदाजी शैलीची चाचपणी करण्यात यावी, अशी मागणी जोर धरत आहे.
पाकिस्तानचा 'फेकी बॉलर'? स्पिनर Usman Tariq ची दगड मारल्यासारखी 'अॅक्शन'; 'चिटिंग'चा आरोप
माजी क्रिकेटरनं फुटबॉलचा दाखला देत उपस्थितीत केला प्रश्न
पाकिस्तानी गोलंदाजासंदर्भात अनेकजण गोलंदाजी करताना तो कोपरात हात वाकण्यावर आक्षेप घेत असताना भारताचा माजी क्रिकेटर श्रीवत्स गोस्वामी याने विशेषतः चेंडू टाकण्याआधी तो थांबून चेंडू टाकतो त्यावर आक्षेप घेतला आहे. फुटबॉलचा दाखला देताना माजी क्रिकेटरनं म्हटलंय की, "फुटबॉलमध्ये पेनल्टी घेताना रन-अपमध्ये थांबण्याची परवानगी नसते. मग क्रिकेटमध्ये थांबून चेंडू टाकणं कस चालते.? गोलंदाजीतील या शैलीची पुन्हा तपासणी करायला हवी.
अश्विनने घेतली पाकिस्तानी गोलंदाजाची बाजू, म्हणाला...
गोस्वामींच्या मतावर प्रतिक्रिया देताना रविचंद्रन अश्विन यांनी चर्चेला वेगळी दिशा दिली आहे. नियमांची कडक अंमलबजावणी फक्त गोलंदाजांसाठी का? असा प्रश्न अश्विनने उपस्थितीत केला आहे. तो म्हणाला की, "फुटबॉलमध्ये पेनल्टीदरम्यान थांबता येत नाही, हे बरोबर आहे. पण फलंदाज स्विच-हिट किंवा रिव्हर्स शॉट खेळताना अंपायर किंवा गोलंदाजाला सांगत नाही. मग निर्बंध फक्त गोलंदाजांवरच का? गोलंदाजाला हात बदलायचा असेल, तर अंपायरला कळवावे लागते."
त्याच्यावर आरोप करणं चुकीच, अश्विनने सांगितला नियम
गोलंदाजाची शैली योग्य आहे का? ते फक्त ICC बॉलिंग अॅक्शन टेस्टिंग सेंटरमध्येच तपासली जाऊ शकते. गोलंदाजालाठी १५ अंश नियम लागू असून कोपर त्यापेक्षा अधिक वाकू नये, अशी अपेक्षा असते. मैदानावरील अंपायर प्रत्यक्षात हा अंश मोजू शकत नाही.यासाठी रिअल-टाइम टेस्टिंग टूल हा एकमेव उपाय आहे. ‘ग्रे एरिया’चा गैरफायदा घेतल्याचा आरोप करणे चुकीचे आहे. क्रीजवर थांबणे बेकायदेशीर नाही, कारण तो त्याचा नियमित अॅक्शनचा भाग आहे, असेही अश्विनने म्हटले आहे.
Web Summary : R. Ashwin defended Usman Tariq, a Pakistani bowler accused of illegal action. Ashwin questioned why bowling rules are stricter than batting, highlighting the switch-hit advantage. He emphasized action testing should be at ICC centers only.
Web Summary : आर. अश्विन ने अवैध एक्शन के आरोपों से घिरे पाकिस्तानी गेंदबाज उस्मान तारिक का बचाव किया। अश्विन ने सवाल उठाया कि गेंदबाजी के नियम बल्लेबाजी से ज़्यादा सख़्त क्यों हैं, और स्विच-हिट के फ़ायदे पर ज़ोर दिया। उन्होंने कहा कि एक्शन टेस्टिंग सिर्फ़ आईसीसी सेंटरों पर ही होनी चाहिए।