Join us

T20 World Cup 2024 IND vs USA Live Match : भारताने टॉस जिंकला अन् प्लेइंग इलेव्हनमध्ये पाहा कोणाला दिली संधी, कॅप्टनची माघार

ICC T20 World Cup 2024 IND vs USA Live Scorecard -  भारत विरुद्ध अमेरिका या सामन्यावर पाकिस्तानचे भविष्य अवलंबून आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 12, 2024 19:38 IST

Open in App

ICC T20 World Cup 2024 IND vs USA Live Scorecard -  भारत विरुद्ध अमेरिका या सामन्यावर पाकिस्तानचे भविष्य अवलंबून आहे. अमेरिका व भारत यांनी अ गटात सलग दोन विजय मिळवून सुपर ८ च्या दिशेने कूच करणार आहे. या सामन्यातील विजेता संघ ६ गुणांसह सुपर ८ मध्ये पोहोचेल. आज भारत जिंकल्यास पाकिस्तानला फायदा होणार आहे. त्यामुळे आज पाकिस्तानचे चाहते भारताच्या विजयासाठी चिअर करताना दिसतील. अमेरिकेने अ गटात कॅनडा व पाकिस्तान यांचा पराभव केला. भारतानेही आयर्लंड व पाकिस्तानवर मात दिली. अमेरिकेच्या संघात बरेच भारतीय असल्याने टीम इंडियाविरुद्ध त्यांची कामगिरी कशी होईल, याची उत्सुकता आहे.   विराट कोहलीने १४ वर्षांपूर्वी आजच्याच दिवशी आंतरराष्ट्रीय ट्वेंटी-२० पदार्पण केले होते. १२ जून २०१० मध्ये त्याने झिम्बाब्वेविरुद्ध नाबाद २६ धावा केल्या होत्या. रोहित शर्माने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला आणि प्लेइंग इलेव्हनमध्ये कोणताच बदल केलेला नाही. आजच्या सामन्यात संजू सॅमसनला संधी मिळेल अशी अपेक्षा होती, पण रोहितने तसे नाही केले. शिवम दुबेला आणखी एक संधी दिली गेली, तर कुलदीप यादव व युझवेंद्र चहल यांची प्रतिक्षा वाढली आहे. अमेरिका संघाचा कर्णधार मोनांक पटेल खांद्याच्या दुखापतीमुळे या सामन्याला मुकला आहे.

भारताचा संघ- रोहित शर्मा, विराट कोहली, रिषभ पंत, सूर्यकुमार यादव, हार्दिक पांड्या, शिवम दुबे, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, अर्शदीप सिंग 

टॅग्स :ट्वेंटी-20 वर्ल्ड कप 2024भारतीय क्रिकेट संघअमेरिका