ICC T20 World Cup 2024 IND vs IRE Live Scorecard - ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेला सुरुवात झाल्यापासून १४० कोटींहून अधिक भारतीय ज्या दिवसाची वाट पाहत होते, तो अखेर उजाडला. न्यूयॉर्कच्या नासाऊ कौंटी इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियमवर भारतीय फॅन्सची गर्दी वाढू लागली आहे, कारण टीम इंडिया ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेतील त्यांच्या मोहिमेला आयर्लंडविरुद्धच्या लढतीने सुरुवात करणार आहे. या सामन्यात टीम इंडियाची प्लेइंग इलेव्हन कशी असेल, याची सर्वांना उत्सुकता होती. विराटने सामन्यापूर्वी सर्व खेळाडूंना प्रोत्साहित करणारे स्पीच दिले. रोहित शर्माने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला.

भारत आणि आयर्लंड यांनी एकमेकांविरुद्ध आठ सामने खेळले असून त्यापैकी भारताने ७ जिंकले आहेत आणि एका सामन्याचा निकाल लागला नाही. हवामान खात्यानुसार सध्या तेथील तापमान हे २५ डिग्री सेल्सिअस आहे आणि रात्री तेथे पाऊस पडण्याचा अंदाज आहे. त्यामुळे भारत-आयर्लंड यांच्यातला सामना हा तेथील वेळेनुसार सकाळी १०.३० वाजता होत आहे आणि या सामन्याला पावसाचा धोका नाही. पण, सध्या ढगाळ वातावरण दिसत असल्याने चाहते चिंतित होते.
विराट कोहलीचा आयपीएल २०२४ मधील फॉर्म पाहता तो रोहित शर्मासोबत सलामीला खेळणार का, हा प्रश्न सर्वांसमोर होता. कारण, यशस्वी जैस्वालचा फॉर्म हरवलेला जाणवला आहे. त्यामुळे रोहित-विराट ही जोडी सलामीला येणार हे स्पष्ट झाले आहे. कारण, यशस्वी जैस्वाल, संजू सॅमसन, कुलदीप यादव व युझवेंद्र चहल आज प्लेइंग इलेव्हनमध्ये नाही. शिवम दुबे व हार्दिक पांड्या यांच्यासह रवींद्र जडेजा व अक्षर पटेल हे दोन अष्टपैलू संघात आहेत. मोहम्मद सिराज, जसप्रीत बुमराह व अर्शदीप सिंग हे तीन जलदगती गोलंदाज संघात आहेत.