ICC T20 World Cup 2024 IND vs IRE Live Scorecard - चार जलदगती गोलंदाज खेळवण्याचा रोहित शर्माचा निर्णय यशस्वी ठरला. अर्शदीप सिंगने भारी सुरुवात करून दिली. मोहम्मद सिराज, जसप्रीत बुमराह यांनी तिखट मारा करून आयर्लंडच्या फलंदाजांना दडपणाखाली आणले. त्याचे फायदा उचलताना हार्दिक पांड्याने ३ धक्के दिले. हार्दिकने या कामगिरीसह टीकाकारांनाही सडेतोड उत्तर दिले. ICC T20 World Cup Match
अर्शदीपनंतर हार्दिक पांड्या चमकला; जसप्रीत, सिराजचाही मारा, Video
अर्शदीपने त्याच्या पहिल्या स्पेलमध्ये ३-०-१८-२ अशी भन्नाट गोलंदाजी करून पॉल स्टर्लिंग ( २) व अँडी बालबर्नी ( ५) ही जोडी ९ धावांवर माघारी पाठवली. दुसऱ्या बाजूने हार्दिक पांड्याने गोलंदाजीचा मोर्चा सांभाळताना आयर्लंडला तिसरा झटका दिला. त्याने लोर्कन टकरचा ( १०) त्रिफळा उडवला. आयर्लंडचे फलंदाज गोंधळलेल्या, घाबरलेल्या परिस्थितीत दिसले आणि बुमराहने अप्रतिम बाऊन्सरवर त्यांना आणखी एक धक्का दिला. हॅरी टेक्टर ( ४) माघारी परतला. हार्दिक व मोहम्मद सिराज यांनी त्यानंतर अनुक्रमे कर्टीस कॅम्फर ( १२) आणि जॉर्ज डॉक्रेल ( ३) यांना बाद केले. हार्दिकने तिसरी विकेट घेताना मार्क एडरची ( ३) विकेट मिळवली. Ind vs Ire live Online match, Ind vs Ire Latest Score card
ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत १२ वर्षांनी
भारतीय गोलंदाजांनी पहिल्या १० षटकांत ६ विकेट्स घेण्याचा पराक्रम केला. २०१२ मध्ये त्यांनी इंग्लंडचे ६ फलंदाज ५४ धावांत माघारी पाठवले होते. अक्षर पटेलने त्याच्या पहिल्याच षटकात अप्रतिम रिटर्न कॅच टीपून बॅरी मॅककार्थीला भोपळ्यावर तंबूत पाठवले. ट्वेंटी-२०त
भारताने सर्वात कमी धावांत ( ८-५०) प्रतिस्पर्धीचे ८ फलंदाज माघारी पाठवण्याचा पराक्रम या सामन्यात नोंदवला गेला. यापूर्वी २०२३ मध्ये अहमदाबाद येथे न्यूझीलंडचे ८ फलंदाज ५४ धावांत तंबूत पाठवले गेले होते. हार्दिकने ४-१-२७-३ अशी अप्रतिम स्पेल टाकली. Ind vs Ire live Match updates
आयर्लंडचे शेपूट गुंडाळण्याचा विडा जसप्रीतने उचलला आणि जोश लिटल ( १४) याचा अप्रतिम यॉर्कवर त्रिफळा उडवून संघाला नववा धक्का दिला. गॅरथ डेलेनीने मिळालेल्या जीवदानाचा फायदा उचलताना चांगली फटकेबाजी केली आणि अर्शदीपची स्पेल ( ४-०-३५-२) अशी बिघडवली. अर्शदीपच्या चौथ्या षटकात १६ धावा चोपल्या. आयर्लंडचा शेवटचा फलंदाज रन आऊट झाला आणि संपूर्ण संघ ९६ धावांत तंबूत परतला.