ICC T20 World Cup 2021 Afghanistan vs Pakistan Scoreacard Live updates : अफगाणिस्तान आणि सेमी फायनल यांच्या मार्गात पाकिस्तानचा कर्णधार बाबर आजम ( Babar Azam) उभा राहिला आहे. अफगाणिस्ताननं ठेवलेल्या १४८ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना पाकिस्तानची सुरुवात खराब झाली. पण, बाबर व फाखर जमान यांनी डाव सावरला. बाबरनं या सामन्यातून टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली याचा विश्विविक्रम मोडला. मैदानावर या दोन संघांमध्ये कडवी टक्कर पाहायला मिळताना मैदानाबाहेरही नाट्यमय प्रसंग पाहायला मिळाले. अफगाणिस्तानला चिअर करण्यासाठी हजारोंच्या संख्येनं चाहते उपस्थित होते आणि त्यातील बरेचसे विनातिकिटच स्टेडियममध्ये घुसले होते. होय हे खरं आहे. सुरक्षारक्षकांना न जुमानता अफगाणिस्तानचे चाहते स्टेडियममध्ये घुसले आणि तिकिट असूनही पाकिस्तानी चाहत्यांना बाहेरच थांबावे लागले. हे भांडण इथेच थांबले नाही, तर स्टेडियममध्ये दोन्ही संघांच्या चाहत्यांमध्ये तुंबळ हाणामारी झाल्याचेही पाहायला मिळाले.
अफगाणिस्ताननं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. हझरतुल्लाह झझाई ( ०) व मोहम्मद शाबजाज ( ८) यांना अुक्रमने इमाद वासीम व शाहिन यांनी बाद केले. त्यानंतर टप्प्याटप्पानं अफगाणिस्तानच्या विकेट्स पडतच होत्या. पण, त्यांचा प्रत्येक फलंदाज आक्रमक पवित्र्यातच होता. रहमनुल्लाह गुर्बाज ( १०) व अस्घर अफघान ( १०) हेही आक्रमक खेळण्याच्या प्रयत्नात विकेट गमावून बसले. करीन जनत ( १५) हा बाद झाल्यानंतर अफगाणिस्तानची अवस्था ६ बाद ७६ अशी झाली होती. नजिबुल्लाह झाद्रान व कर्णधार मोहम्मद नबी यांनी संघाचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला, परंतु २२ धावांवर झाद्रान बाद झाला. नबी व गुलबदीन नैब या जोडीनं अफगाणिस्तानला सन्मानजक धावसंख्या उभी करून दिली. नबी ३५ आणि नैब ३५ धावांवर नाबाद राहिले. या जोडीनं अखेरच्या पाच षटकांत धावांचा पाऊस पाडला आणि संघाला ६ बाद १४७ धावा उभ्या करून दिल्या.
पाकिस्तानची सुरूवात साजेशी झाली नाही. मोहम्मद रिझवाद ८ धावांवर बाद झाल्यानंतर कर्णधार बाबर आजम आणि फाखर जमान यांनी पाकिस्तानचा डाव सावरला. मुजीब उर रहमाननं अफगाणिस्तानला पहिले यश मिळवून दिले. १२ धावांवर पहिली विकेट पडूनही बाबर ( Babar Azam) खेळपट्टीवर अडून बसला. बाबर व जमान यांनी पाकिस्तानला ११ षटकांत १ बाद ७५ धावांपर्यंत मजल मारून दिली आहे. राशीद खानच्या गोलंदाजीवर DRSमुळे जीवदान मिळालेल्या बाबरनं अर्धशतकी खेळी केली. पण, फाखर २५ चेंडूंत ३० धावांवर बाद झाला. मोहम्मद हाफिज ( १०) पुन्हा अपयशी ठरला. राशिदनं त्याची विकेट घेत ट्वेंटी-२० क्रिकेटमध्ये सर्वात जलद १०० बळी टिपण्याचा विक्रम नावावर केला. त्यानं ५३ डावांमध्ये विकेट्सचे शतक पूर्ण करून लसिथ मिलंगाचा ( ७६) विक्रम मोडला.
पाहा व्हिडीओ