ICC T20 World Cup 2021 India vs Pakistan Scoreacard Live updates: भारत-पाकिस्तान बहुप्रतिक्षित सामन्यातील नाणेफेकीचा कौल बाबर आजमच्या बाजूनं लागला आणि त्यांनी गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पाकिस्ताननं हैदर अलीला बाहेर ठेवताना युवा व अनुभवी खेळाडूंसह खेळणे पसंत केलं. विराट कोहलीनंही ( Virat Kohli) प्रथम गोलंदाजी करायला आवडले असते असे प्रांजळ मत व्यक्त केले. आजच्या सामन्यात शार्दूल ठाकूर, आर अश्विन, राहुल चहर आणि इशान किशन यांना बाकावर बसवलं. 
हार्दिक पांड्यानं आजच्या सामन्यात गोलंदाजी करणार नसल्याचे स्पष्ट केले. रोहित शर्मा व लोकेश राहुल यांनी डावाची सुरुवात केली. पण, भारताला पहिल्याच षटकात धक्का दिला. पाकिस्तानचा माजी अष्टपैलू खेळाडू शाहिद आफ्रिदी याचा होणारा जावई शाहिन शाह आफ्रिदी ( Shaheen Afridi ) यानं पहिल्याच षटकात टीम इंडियाला मोठा धक्का दिला. लोकेशनं तिसऱ्या चेंडूवर एक धाव घेत रोहितला स्ट्राईक दिली. पण, शाहिनच्या भेदक व आता येणाऱ्या चेंडूनं त्याची विकेट घेतली. तिसऱ्या चेंडूवर शाहिननं टीम इंडियाचा सलामीवीर लोकेशचा ( ३) त्रिफळा उडवला.
रोहितला काही समजण्यापूर्वीच शाहिननं टाकलेला चेंडू रोहितच्या पायावर आदळला अन् LBW ची जोरदार अपील झाली. अम्पायरनंही लगेच हात वर केला व रोहित गोल्डन डकवर बाद झाला. २०१६नंतर प्रथमच रोहित ट्वेंटी-२० क्रिकेटमध्ये गोल्डन डकवर बाद झाला. यापूर्वी २०१२मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध व २०१६मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध गोल्डन डकवर तो बाद झाला होता. ( Golden ducks for Rohit Sharma in T20Is) 
ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत गोल्डन डकवर बाद होणारे भारतीय खेळाडू  
Dinesh Karthik, 2007
Murali Vijay, 2010
Ashish Nehra, 2010
Suresh Raina, 2016
Rohit Sharma, 2021*