Join us  

T20 World Cup 2021 Ind vs Pak Live Score: शाहिन आफ्रिदीनं भारताला ५ धावा दिल्या, Comedy पाहून जय शाह, अक्षय कुमारनं डान्स केला; Video 

भारताचे आघाडीचे तीन फलंदाज ३१ धावांवर माघारी परतल्यानंतर कर्णधार विराट कोहली ( Virat Kohli) आणि रिषभ पंत ( Rishabh Pant) यांनी चौथ्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी करताना टीम इंडियाचा डाव सावरला

By ऑनलाइन लोकमत | Published: October 24, 2021 9:38 PM

Open in App

ICC T20 World Cup 2021 India vs Pakistan Scoreacard Live updates: शाहिन शाह आफ्रिदीनं ( Shaheen Shah Afridi) सुरुवातीला धक्के दिल्यानतंरही टीम इंडियानं आजच्या सामन्यात पाकिस्तानसमोर आव्हानात्मक धावसंख्या उभी केली. हा सामना पाहण्यासाठी टीम इंडियाचा सलामीवीर शिखर धवन, बीसीसीआय सचिव जय शाह ( Jay Shah) आणि बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार ( Akshay Kumar) यांच्यासह अनेक सेलिब्रेटी हजर होते. ज्या शाहिननं टीम इंडियाला धक्के दिले, त्याच्याकडूनच एक Comedy Seen घडला अन् प्रेक्षकांसह जय शाह यांनीही डान्स केला. 

भारताचे आघाडीचे तीन फलंदाज ३१ धावांवर माघारी परतल्यानंतर कर्णधार विराट कोहली ( Virat Kohli) आणि रिषभ पंत ( Rishabh Pant) यांनी चौथ्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी करताना टीम इंडियाचा डाव सावरला. रिषभ पुन्हा एकदा घाई करून माघारी परतला, पण त्यानं त्याची जबाबदारी सक्षमपणे पार पाडली. चौथ्या विकेटसाठी ४० चेंडूंत ५३ धावा जोडल्या आणि यात रिषभच्या ३९ धावा होत्या. विराट ४९ चेंडूंत ५ चौकार व १ षटकार खेचून ५७ धावांवर झेलबाद झाला. भारतानं २० षटकांत ७ बाद १५१ धावा केल्या. शाहिननं टाकलं १९वं षटक अन् जय शाह यांचा डान्स 

पाकिस्तानचा गोलंदाज शाहिननं १९व्या षटकात टीम इंडियाला आणखी एक धक्का दिला. त्यानं विराटची विकेट घेतली. शाहिनच्या त्या षटकाच्या अखेरच्या चेंडूवर कॉमेडी झाली. हार्दिक पांड्या संथ बाऊन्सरवर फटका मारण्यापासून चूकला अन् चेंडू यष्टिरक्षकाकडे गेला. हार्दिक व भुवनेश्वर धाव घेण्यासाठी धावले, रिझवाननं स्ट्रायकर एंडला रनआऊट करण्यासाठी चेंडू फेकला. पण, चेंडू आफ्रिदीच्या हातात गेला, त्यानं तो नॉन स्ट्रायकर एंडला जोरात फेकला अन् भारताला चौकार मिळाला. टीम इंडियाला ओव्हर थ्रो मध्या पाच धावा मिळाल्या अन् बीसीसीआय सचिव जय शाह, बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार हेही नाचू लागले. शाबादनं ४ षटकांत २२ धावांत १ विकेट घेतली. हसन अली ( Hasan Ali) ४ षटकांत ४३ धावा देत दोन विकेट्स घेतल्या. 

पाहा व्हिडीओ..

टॅग्स :ट्वेंटी-२० वर्ल्ड कप २०२१जय शाहभारत विरुद्ध पाकिस्तानअक्षय कुमारऑफ द फिल्ड
Open in App