Join us

T20 World Cup 2021 Ind vs NZ Live Score: विराट कोहलीच्या 'त्या' निर्णयांनी केला घात, टीम इंडियाच्या कामगिरीवर वीरेंद्र सेहवागची फटकेबाजी

ICC T20 World Cup 2021 India vs New Zealand  Scoreacard Live updates : भारतीय संघाला आज पुन्हा एकदा लाजीरवाणा पराभव पत्करावा लागला. भारताला ७ बाद ११० धावाच करता आल्या आणि न्यूझीलंडनं हे लक्ष्य सहज पार केलं.

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 1, 2021 00:08 IST

Open in App

ICC T20 World Cup 2021 India vs New Zealand  Scoreacard Live updates : भारतीय संघाला आज पुन्हा एकदा लाजीरवाणा पराभव पत्करावा लागला. भारताला ७ बाद ११० धावाच करता आल्या आणि न्यूझीलंडनं हे लक्ष्य सहज पार केलं. या सामन्यात कर्णधार विराट कोहलीचे ( Virat Kohli) निर्णय चुकले आणि त्याचा फटका कुठेतरी टीम इंडियाला बसला. माजी निवड समिती प्रमुख संदीप पाटील यांनी समालोचन करताना या निर्णयाचे वाभाडे काढलेच, शिवाय माजी सलामीवीर वीरेंद्र सेहवाग यानंही जोरदार टिका केली. न्यूझीलंडनं नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. टीम इंडियानं इशान किशन व लोकेश राहुल या जोडीचा प्रयोग केला, परंतु तो फसला. रोहित शर्माला जीवदान मिळूनही काही खास करता आले नाही.

कर्णधार विराट कोहली व रिषभ पंत यांनी दडपणात विकेट फेकल्या. हार्दिक पांड्या २३ व रवींद्र जडेजा नाबाद २६ धावा करून संघाला ७ बाद ११० धावांपर्यंत मजल मारून दिली. ट्रेंट बोल्ट ( ३-२०), इश सोढी ( २-१७) यांच्यासह टीम साऊदी ( १-२६), अॅडम मिल्ने ( १-३०) यांनीही चांगली गोलंदाजी केली. न्यूझीलंडनं डॅरील मिचेलनं ४९ धावा करताना टीम इंडियाच्या गोलंदाजांची धुलाई केली. मिचेल ३५ चेंडूंत  ४ चौकार व ३ षटकारांसह ४९ धावांवर बाद झाला आणि केनसह त्याची ७२ धावांची भागीदारीही संपुष्टात आलीकेन विलियम्सन ३३ धावांवर नाबाद राहिला आणि मार्टीन गुप्तील २० धावांवर बाद झाला. भारतासाठी दोन्ही विकेट्स जसप्रीत बुमराहनं घेतल्या. 

वीरेंद्र सेहवाग काय म्हणाला?भारतीय संघाकडून अत्यंत निराशाजनक खेळ झाला.  त्यांची देहबोलीच पराजित योद्ध्यासारखी होती. चुकीचे फटके मारून त्यांनी स्वतःचा घात करून घेतला. न्यूझीलंडनं अप्रतिम कामगिरी करून टीम इंडियाचा पुढील फेरीत जाण्याचा मार्ग बंदच केला. भारतीय संघाला आता आत्मपरिक्षणाची गरज आहे, असे वीरूनं ट्विट केलं. विराटचे फसलेले निर्णय अन् फलंदाजांचे अपयश...

  • आजच्या सामन्यात टीम इंडियात बदल होईल, हे अपेक्षित होते. पण, काहीच कामाचा नसलेल्या हार्दिक पांड्याला संधी देणं पुन्हा महागात पडले. १२व्या षटकापासून हार्दिक खेळपट्टीवर होता, पण त्याला केवळ २३ धावाच करता आल्या. आयपीएलमध्ये अखेरच्या ५ षटकांत ९० धावा कुटणारा हा फलंदाज आज गरज असताना ढेपाळला. त्यानं गोलंदाजी केली नाही अशी टीका होऊ नये म्हणून विराटनं त्याच्याकडून दोन षटकं टाकून घेतली.

  • रोहित शर्माच्या फलंदाजीच्या क्रमवारीत अचानक बदल करण्याचा डाव काहीच  समजला नाही. रोहित पहिल्या सामन्यात भोपळ्यावर बाद झाला म्हणून याही सामन्यात तसंच होईल, असं नाही. तरीही महत्त्वाच्या लढतीत इशान किशन व लोकेश राहुल ही जोडी पाठवली. त्यातून निष्पन्न काय झालं, तर काहीच नाही. उलट इशान बाद झाल्यानं रोहितवरच दडपण आलं.

  • वरुण चक्रवर्थीकडून सुरुवातीची चार षटकं फेकून घेऊन मोहम्मद शमीला मागे ठेवण्यात कोणता शहाणपणा होता तेच कळेना. शमीला ७व्या षटकात पाचारण केलं गेलं आणि त्याआधी चक्रवर्थीची चार षटकं पूर्ण करून घेतली. रवींद्र जडेजानंही पॉवर प्लेमध्ये गोलंदाजी केली.
  • फलंदाजांचे चुकीचे फटके  टीम इंडियाला महागात पडले. संयमी खेळ  व मैदानालगचे फटके मारूनही धावा करता येतात हेच भारतीय खेळाडू विसरले. त्यामुळे आत्मघातकी फटके मारून ते माघारी परतले.

 
टॅग्स :ट्वेंटी-२० वर्ल्ड कप २०२१भारतीय क्रिकेट संघभारत विरुद्ध न्यूझीलंडविरेंद्र सेहवाग
Open in App