Join us  

T20 World Cup 2021 Aus vs SA Live Score: ऑस्ट्रेलिया - दक्षिण आफ्रिका सामन्यात कांगारूंचे वर्चस्व, पण सोशल मीडियावर चर्चा रंगलीय 'या' फोटोची

ICC T20 World Cup 2021 Australia vs South Africa Scoreacard Live updates : ट्वेंटी-20 वर्ल्ड कप स्पर्धेच्या Super 12 मधील पहिल्याच सामन्यात ऑस्ट्रेलियानं वर्चस्व गाजवलेलं पाहायला मिळत आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: October 23, 2021 4:35 PM

Open in App

ICC T20 World Cup 2021 Australia vs South Africa Scoreacard Live updates : ट्वेंटी-20 वर्ल्ड कप स्पर्धेच्या Super 12 मधील पहिल्याच सामन्यात ऑस्ट्रेलियानं वर्चस्व गाजवलेलं पाहायला मिळत आहे. जोश हेझलवूड व ग्लेन मॅक्सवेल यांनी टिच्चून मारा करताना दक्षिण आफ्रिकेला कोंडीत पकडले आणि त्यांचे चार फलंदाज अवघ्या ४६ धावांवर माघारी परतले होते. अबु धाबीच्या स्टेडियमवर रंगत असलेल्या या सामन्यात प्रेक्षकांमध्ये सोशल डिस्टन्सिंग राखली जावी यासाठी आयोजकांनी एक भन्नाट आयडिया लढवली आणि सोशल मीडियावर सध्या तोच फोटो व्हायरल झाला आहे. कोरोना संकट अजून दूर झाले नसले तरी ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेतील सामन्यांना ७० टक्के प्रेक्षकांच्या उपस्थितीला आयसीसीनं परवानगी दिली आहे. T20 World Cup 2021 Aus vs SA Scorecard:

T20 World cup 2021, Aus vs SA- २०१६ नंतर ऑस्ट्रेलियाच्या ट्वेंटी-२० संघात प्रथमच मिचेल स्टार्क, पॅट कमिन्स आणि जोश हेझलवूड हे त्रिकुट एकत्र खेळत आहे. कर्णधार टेम्बा बवुमा यानं आफ्रिकेला स्फोटक सुरुवात करून दिली. त्यानं मिचल स्टार्कनं टाकलेल्या पहिल्याच षटकात दोन सुरेख चौकार खेचले. बवुमा ६ चेंडूं १२ धावांवर खेळत असताना मॅक्सवेलनं टाकलेल्या चेंडूनं कमी उसळी घेतली आणि थेट यष्टिंचा वेध घेतला. बवुमाला तो चेंडू समजलाच नाही. त्यानंतर हेझलवूडनं पुढच्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर रॅसी व्हॅन डेर ड्युसेनला ( २) यष्टिरक्षक मॅथ्यू वेड करवी झेलबाद केले. ड्युसेननं सराव सामन्यात पाकिस्तानविरुद्ध शतक झळकावले होते. T20 World Cup 2021 Aus vs SA live Score:

क्विंटन एकाबाजूनं खिंड लढवत होता, परंतु त्याचीच विकेट चर्चेचा विषय ठरतेय. हेझलवूडच्या चेंडूवर तिन्ही स्टम्प सोडून स्कूप मारण्याचा त्याचा प्रयत्न फसला अन् हवेत झेपावलेला चेंडू एक टप्पा घेत यष्टिंवर आदळला. क्विंटन ७ धावांवर बाद झाला. हेनरिच क्लासेन ( १३) याला पॅट कमिन्सन माघारी पाठवून आफ्रिकेची अवस्था ४ बाद ४६ अशी केली. T20 world cup news in marathi, T20 World Cup Aus vs SA live scorecard 

टॅग्स :ट्वेंटी-२० वर्ल्ड कप २०२१ऑफ द फिल्डद. आफ्रिकाआॅस्ट्रेलिया