ICC suspends USA Cricket with immediate effect : आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेनं (ICC) मंगळवारी अमेरिकन (USA) क्रिकेटसंदर्भात मोठा निर्णय घेतला आहे. मागील वर्षभराचा आढावा घेत महत्त्वाच्या हितधारकांशी विस्तृत चर्चा केल्यानंतर ICC न तत्काळ प्रभावाने अमेरिकन क्रिकेट संघाचे (USA Cricket) सदस्यत्व निलंबित केल्याची पुष्टी केली आहे. आयसीसी सदस्य असताना USA क्रिकेटकडून सातत्याने जबाबदाऱ्यांचं उल्लंघन करण्यात आले. खेळाच्या प्रतिमेला धक्का पोहोचवण्याचा प्रयत्न झाला. त्यामुळेच ही कारवाई करण्यात आली आहे, असे आयसीसीने म्हटले आहे.
अमेरिकन क्रिकेट संघाच सदस्यत्व रद्द करण्यामागचं कारण
वर्षभराच्या पुनरावलोकनानंतर आणि हितधारकांशी झालेल्या सखोल चर्चेनंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या बोर्डाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. USA क्रिकेट प्रभावी शासकीय रचना लागू करण्यात, United States Olympic आणि Paralympic Committee (USOPC) कडून मान्यता मिळविण्यात आणि आवश्यक सुधारणा करण्यात पूर्णपणे अपयशी ठरलं आहे, असे ICC नं म्हटले आहे.
आता अमेरिकन क्रिकेट संघाला ICC सह ऑलिम्पिक स्पर्धेत भाग घेता येईल का?
अमेरिकन क्रिकेट संघावर निलंबनाची कारवाई झाली असली तरी आयसीसीच्या स्पर्धेत सहभागी होण्याची संधी त्यांना दिली जाईल. याशिवाय २०२८ मध्ये लॉस एंजेलिसमध्ये आयोजित ऑलिम्पिक स्पर्धेतही त्यांना सहभाग घेता येणार आहे. यादरम्यान अमेरिकेच्या राष्ट्रीय संघाचे तात्पुरत्या व्यवस्थापनाची जबाबदारी ही ICC सह त्यांच्या प्रतिनिधींकडे असेल.
ICC कडून समिती नेमली जाणार
अमेरिकन क्रिकेटमधील सुधारणा आणि नवीन संरचना तयार करण्यासाठी ICC कडून एक समिती नेमण्यात येणार आहे. ही समिती शासकीय व्यवस्थापन, कार्यप्रणाली आणि संरचनेत बदल करण्याची रूपरेषा निश्चित करेल. यासोबतच संक्रमण काळात सहकार्य करेल.अमेरिकन क्रिकेट संघाचे सदस्यत्व रद्द करणे दुर्दैवी आहे. पण खेळाच्या दीर्घकालीन हिताचा विचार करता हा निर्णय गरजेचा आहे. आम्ही खेळाडूंच्या सुरक्षिततेसह अमेरिकेत क्रिकेटच्या विकासासाठी वचनबद्ध आहोत, असेही ICC नं म्हटले आहे.
Web Title: ICC suspends USA Cricket with immediate effect due to breach of member obligations
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.