Join us  

WTC Points System : आयसीसीची मोठी घोषणा, टीम इंडियाला पुन्हा जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेची फायनल गाठणे होणार अधिक आव्हानात्मक!

ICC revealed new points system for World Test Championship 2021-23 आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेनं ( ICC) बुधवारी आयसीसी जागतिक कसोटी अजिंक्यपद २०२१-२३ ( ICC World Test Championship 2021-23) च्या पर्वासाठी नवीन गुणपद्धत जाहीर केली.

By ऑनलाइन लोकमत | Published: July 14, 2021 11:52 AM

Open in App
ठळक मुद्देइंग्लंड सर्वाधिक 21 कसोटी सामने खेळणार आहेत. त्यानंतर भारत ( 19), ऑस्ट्रेलिया ( 18) आणि दक्षिण आफ्रिका ( 15) यांना सर्वाधिक कसोटी सामने खेळता येणार आहेतइंग्लंड विरुद्ध भारत यांच्यातल्या पाच कसोटी सामन्यांच्या पतौडी चषक मालिकेला ४ ऑगस्टपासून सुरूवात होणार आहे. याच मालिकेपासून जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचे दुसरे पर्वही सुरू होत आहे.

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेनं ( ICC) बुधवारी आयसीसी जागतिक कसोटी अजिंक्यपद २०२१-२३ ( ICC World Test Championship 2021-23) च्या पर्वासाठी नवीन गुणपद्धत जाहीर केली. त्याशिवाय आयसीसीनं २०२१-२३चे वेळापत्रकही जाहीर केलं आहे. इंग्लंड विरुद्ध भारत यांच्यातल्या पाच कसोटी सामन्यांच्या पतौडी चषक मालिकेला ४ ऑगस्टपासून सुरूवात होणार आहे. याच मालिकेपासून जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचे ( second cycle of the World Test Championship) दुसरे पर्वही सुरू होत आहे. ऑगस्ट 2021 ते जून 2023 या कालावधीत WTC स्पर्धेचे दुसरे पर्व होणार असून यात भारत-इंग्लंड आणि अॅशेस या दोन मालिका पाच सामन्यांच्या आहेत.  

ऑस्ट्रेलियाचा संघ पुढील वर्षी भारत दौऱ्यावर आहे आणि तेथे चार सामन्यांची मालिका खेळणार आहे. याव्यतिरिक्त तीन सामन्यांच्या सात मालिका आणि दोन सामन्यांच्या 13 मालिका खेळवण्यात येणार आहेत. आयसीसीनं अद्याप फायनल कुठे खेळवली जाईल, हे निश्चित केलेले नाही. WTCच्या पहिल्या पर्वाप्रमाणे कसोटी खेळणारे नऊ संघ तीन होम व तीन अवे अशा सहा मालिका खेळतील.  

या कालावधीत इंग्लंड सर्वाधिक 21 कसोटी सामने खेळणार आहेत. त्यानंतर भारत ( 19), ऑस्ट्रेलिया ( 18) आणि दक्षिण आफ्रिका ( 15) यांना सर्वाधिक कसोटी सामने खेळता येणार आहेत. WTCच्या पहिल्या पर्वातील विजेत्या न्यूझीलंडच्या वाट्याला 13 कसोटी सामने आहेत. त्याच्यासोबत वेस्ट इंडिज आणि श्रीलंका यांच्या वाट्याला 13 सामने आहेत. पाकिस्तान 14 सामने खेळणार आहेत, तर बांगलादेश 12 सामने खेळतील.  

कशी असेल नवीन Points System प्रत्येक संघाला समान कसोटी सामने मिळणार नसल्यामुळे गुणतालिकेतील तफावत टाळण्यासाठी आयसीसीनं प्रत्येक सामन्याला समान गुण दिले आहेत. त्यानुसार प्रत्येक कसोटी विजयाला १२ गुण दिले जाणार आहेत, सामना बरोबरीत सुटल्यास ६-६, तर अनिर्णीत राहिल्यास ४-४ गुण दिले जाणार आहेत. या गुणांसोबतच टक्केवारीही ठरली आहे. १२ गुणांला १०० टक्के, ६ गुणांना ५० टक्के आणि ४ गुणांना ३३.३३ टक्के दिले जाणार आहेत. दोन सामन्यांची मालिका २४, तिन सामन्यांची मालिका ३६, चार सामन्याची मालिका ४८ आणि पाच सामन्यांची मालिका ६० गुणांची असणार आहे. 

टॅग्स :जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धाभारतीय क्रिकेट संघभारत विरुद्ध इंग्लंड