Join us
Daily Top 2Weekly Top 5

आयसीसीच्या कसोटी क्रमवारीत कोहली दुसऱ्या स्थानी

चेतेश्वर पुजारा या यादीत सातव्या आणि अजिंक्य रहाणे दहाव्या स्थानावर

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 16, 2020 04:24 IST

Open in App

दुबई : भारतीय कर्णधार विराट कोहली मंगळवारी प्रसिद्ध केलेल्या आयसीसी कसोटी रँकिंगमध्ये फलंदाजांच्या यादीत दुसऱ्या स्थानावर पोहचला आहे तर चेतेश्वर पुजारा या यादीत सातव्या आणि अजिंक्य रहाणे दहाव्या स्थानावर आहे. कोहली ८८६ गुणासह दुसऱ्या तर ऑस्ट्रेलियाचा फलंदाज स्टीव्ह स्मिथ ९११ गुणांसह अव्वल स्थानी आहे. न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसन तिसऱ्या स्थानावर आहे. त्यानंतर युवा फलंदाज मार्नस लाबुशेन, पाकिस्तानचा बाबर आजम आणि डेविड वॉर्नर हे यादीत आहेत. पुजारा ७६६ गुणांसह सातव्या स्थानी आहे. बेन स्टोक्स (७६०) जो रुट (७३८) व भारताचा रहाणे हे अव्वल दहा मधील फलंदाज आहेत.  भारतीय जलदगती गोलंदाजीचे नेतृत्व करणारा जसप्रीत बुमराह हा आठव्या तर रविचंद्रन अश्विन दहाव्या क्रमांकावर आहे. या यादीत पॅट कमिन्स अव्वल तर दुसऱ्या स्थानावर स्टुअर्ट ब्रॉड आणि न्यूझीलंडच्या नील वॅगनर हे आहेत. 

टॅग्स :विराट कोहलीआयसीसी