Join us

आयसीसी क्रमवारी : लोकेश राहुलची भरारी, टॉप टेनमध्ये एकमेव भारतीय फलंदाज

या क्रमवारीत कोहली 17व्या स्थानावर आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 28, 2019 15:40 IST

Open in App

दुबई : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या ट्वेन्टी-20 मालिकेत धडाकेबाज खेळी साकारणाऱ्या भारताच्या लोकेश राहुललाआयसीसीच्या क्रमवारीत चांगलीच बढती मिळाली आहे. राहुलने क्रमवारीत चार स्थानांची भरारी घेतली असून तो सहाव्या स्थानावर पोहोचला आहे. फलंदाजांच्या क्रमवारीत टॉप टेनमध्ये राहुल हा भारताचा एकमेव फलंदाज

भारताचा कर्णधार विराट कोहलीने दोन स्थानांची बढत घेतली आहे. या क्रमवारीत कोहली 17व्या स्थानावर आहे. भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी क्रमवारीत 56व्या स्थानावर आहे. गोलंदाजांच्या क्रमवारीत भारताच्या जसप्रीत बुमराने 15वे स्थान पटकावले आहे. त्याचबरोबर भारताचा अष्टपैलू कृणाल पंड्याने कारकिर्दीतील सर्वोत्तम असे 43वे स्थान पटकावले आहे.

'या' महान फलंदाजाच्या टिप्सनंतर लोकेश राहुलच्या धावा बरसल्याभरपूर संधी मिळूनही धावांचा पडलेला दुष्काळ, कॉफी विथ करण या कार्यक्रमातील अश्लील वक्तव्य या साऱ्या गोष्टींमुळे भारताचा सलामीवीर लोकेश राहुल निराशेच्या गर्तेत अडकला होता. पण यामधून त्याला भारताच्या एका महान फलंदाजाने बाहेर काढले. या महान फलंदाजाच्या टिप्समुळे राहुलच्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या ट्वेन्टी-20 मालिकेत धावा बरसल्या. या यशानंतर राहुलनेच आपल्याला एका दिग्गज खेळाडूने मार्गदर्शन केल्याचे म्हटले आहे.

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या ट्वेन्टी-20 सामन्यात राहुलने अर्धशतक झळकावले होते. त्याच्या अर्धशतकामुळे भारताला 126 धावा करता आल्या होत्या. दुसऱ्या सामन्यातही राहुलचे अर्धशतक फक्त तीन धावांन हुकले होते. या कामगिरीनंतर राहुल चांगल्या फॉर्ममध्ये आल्याचे म्हटले जात आहे. पण एका दिग्गज फलंदाजाने राहुलला मार्गदर्शन केल्यानंतर हा बदल पाहायला मिळाला आहे.

राहुल याबाबत म्हणाला की, " संघातून मला बाहेर काढण्यात आले होते. तेव्हा मी भारतीय 'अ' संघातून खेळत होतो. त्यावेळी राहुल द्रविड हे आमचे प्रशिक्षक होते. त्यांनी माझ्या फलंदाजीवर मेहनत घेतली. त्यांनी बऱ्याच गोष्टी मला समजवून सांगितल्या. त्यांच्या मार्गदर्शनामुळेच मी संघात परतलो आणि माझ्याकडून चांगल्या धावा होत आहेत."

भारताने मालिका गमावलीभारतीय संघाला दुसऱ्या ट्वेंटी-20 सामन्यात ऑस्ट्रेलियाने पराभवाची चव चाखवत मालिका 2-0ने खिशात घातली. ऑस्ट्रेलियाने 190 धावांचे लक्ष्य 7 विकेट आणि 2 चेंडू राखून पार केले. ग्लेन मॅक्सवेलने नाबाद 113 धावांची तुफान खेळी केली. ऑस्ट्रेलियाने या मालिकेत दोन्ही वेळा धावांचा यशस्वी पाठलाग केला. ऑस्ट्रेलियाने या मालिकेत 2-0 असे निर्भेळ यश मिळवून विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या भारतीय संघाला प्रथमच मालिकेत हार मानण्यास भाग पाडले. कोहलीच्या नेतृत्वाखाली घरच्या मैदानावर भारतीय संघ कोणत्याही प्रकारच्या क्रिकेट मालिकेत प्रथमच पराभूत झाला आहे.

टॅग्स :लोकेश राहुलआयसीसीविराट कोहलीमहेंद्रसिंह धोनी