पाकिस्तान क्रिकेट संघ न्यूझीलंड दौऱ्यावर सपशेल अपयशी ठरला. टी-२० मालिकेनंतर ३ सामन्यांच्या वनडे मालिकेत यजमान संघानं त्यांना व्हाइट वॉश दिला. पराभवाच्या हॅटट्रिकनंतर पाकिस्तान संघावर आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेनं दंडात्मक कारवाई केली आहे. निर्धारित वेळेत षटके पूर्ण न केल्यामुळे संपूर्ण संघाला त्याची किंमत मोजावी लागलीये.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
पाक कॅप्टनने मान्य केली चूक; संघातील प्रत्येकाला मोजावी लागली किंमत
न्यूझीलंड विरुद्ध पाकिस्तान यांच्यातील वनडे मालिकेतील तिसरा आणि अखेरचा वनडे सामना न्यूझीलंडमधील माऊंट माउंगानुई येथील बे ओव्हल स्टेडियमवर खेळवण्यात आला. प्रत्येकी ४२-४२ षटकांच्या सामन्यातही पाकिस्तानच्या संघाला निर्धारित वेळेत षटके पूर्ण करता आली नाहीत. कमालीची गोष्ट म्हणजे याआधीच्या दोन्ही सामन्यात संघावर स्लो ओव्हर रेटची कारवाई झाली होती. तिसऱ्या सामन्यातही तीच चूक केल्यामुळे सलग तीन पराभवासह तिन्ही सामन्यात स्लो ओव्हर रेट प्रकरणात पाकिस्तान क्रिकेट संघाला दंडात्मक कारवाईला सामोरे जावे लागले.
पाकिस्तानची हाराकिरी सुरूच, ओढवली 'व्हाईटवॉश'ची नामुष्की! न्यूझीलंडने दिला मोठा दणका
पाक खेळाडूंच्या खिशाला लागली कात्री
आयसीसी अचारसंहितेच्या कलम २.२२ नुसार, निर्धारित वेळेत षटके पूर्ण केली नाही तर अतिरिक्त वेळतील प्रत्येक षटकासाठी संघातील खेळाडूंच्या सामना शुल्कातील ५ टक्के रक्कम कपात करण्याची कारवाई केली जाते. न्यूझीलंड विरुद्धच्या ३ सामन्यातील वनडे मालिकेतील प्रत्येक सामन्यात पाकिस्तानच्या संघाने ही चूक केली. पाकिस्तानचा कर्णधार मोहम्मद रिझवान याने आपली चूक मान्य केली. त्यानंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेनं पाक संघावर सामना शुल्कातील ५ टक्के रक्कम कपातीची कारवाई केली.
४ जलदगती गोलंदाजांसह खेळण्याचा बसला फटका?
न्यूझीलंड पाकिस्तान यांच्यातील सामन्यात मैदानातील पंच क्रिस ब्राउन आणि पॉल रीफेल यांच्यासह थर्ड अंपायर मायकल गॉफ आणि फोर्थ अंपायर वेन नाइट्स यांनी पाकिस्तान संघाला स्लो ओव्हर रेटमध्ये दोषी ठरवले होते. पाकिस्तान कर्णधाराने आपली चूक मान्य केल्यावर आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने संघावर कारवाई केली. पाकिस्तानच्या संघ या मालिकेत ४ जलदगती गोलंदाजांसह मैदानात उतरला होता. त्यामुळेच पाकिस्तान संघ निर्धारित वेळेत षटके पूर्ण करणं जमले नाही.