Join us
Daily Top 2Weekly Top 5

पाकिस्तानी साहिबजादा फरहानला ICC कडून खास गिफ्ट; भारताच्या लेकीचाही 'सन्मान'

महिला गटात भारताच्या अरुंधतीचा जलवा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 23, 2026 14:54 IST

Open in App

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेनं (ICC) सोमवारी २३ मार्च २०२६ रोजी फेब्रुवारी महिन्याच्या प्लेयर ऑफ द मंथ पुरस्कारांची घोषणा केली. पुरुष आणि महिला या दोन्ही गटांत भारत-पाकिस्तानच्या खेळाडूंनी चमकदार कामगिरी करत बाजी मारली. पाकिस्तानचा सलामीवीर फलंदाज साहिबजादा फरहान आणि भारताची जलदगती गोलंदाज अरुंधती रेड्डी यांना ICC नं खास पुरस्काराने सन्मानित केले आहे. 

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा! 

या तिघांना मागे टाकत पाकिस्तानी साहिबजादा ठरला भारी

साहिबजादा फरहान याने टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत दोन शतकासह अनेक विश्वविक्रम प्रस्थापित केले. त्याच्यासह इंग्लंडचा विल जॅक्स आणि अमेरिकेचा शॅडली वॅन शॉकविक हे दोघे पुरस्काराच्या शर्यतीत होते. पण अखेर पाकिस्तानच्या पठ्ठ्यानंच बाजी मारली.

मुंबई इंडियन्सच्या खेळाडू प्रमाणेच सगळ्यांवर कारवाई होईल; मोहसिन नक्वींची परदेशी खेळाडूंना धमकी

वर्ल्ड कप स्पर्धेत विश्वविक्रमी कामगिरी

 यंदाच्या टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेतील ७ सामन्यातील ६ डावात २ शतके आणि २ अर्धशतकासह त्याने ३८३ धावा केल्या होत्या. एका हंगामात दोन शतक झळकवणारा तो पहिला फलंदाज ठरला. एवढेच नाही तर विराट कोहलीचा टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेतील एका हंगामात सर्वाधिक धावा करण्याचा सर्वकालीन रेकॉर्डही त्याने मोडीत काढला होता. 

महिला गटात भारताच्या अरुंधतीचा जलवा

महिला गटात भारताच्या अरुंधती रेड्डीनं श्रीलंकेच्या हर्षिथा समरविक्रमा आणि पाकिस्तानची फातिमा सना यांना मागे टाकले. अरंधतीनं ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील तीन सामन्यांच्या टी-२० मालिकेत ८ विकेट्स घेतल्या होत्या. सिडनीतील  टी-२० सामन्यात  २२ धावांत ४ विकेट्स घेत तिने कारकिर्दीतील सर्वोत्तम कामगिरीची नोंद केली होती. याच कामगिरीच्या जोरावर ती फेब्रुवारीची क्वीन ठरली आहे.   

English
हिंदी सारांश
Web Title : Pakistani Sahabzada Farhan and Indian Arundhati Reddy win ICC Player awards.

Web Summary : Pakistani opener Sahabzada Farhan and Indian bowler Arundhati Reddy won ICC Player of the Month awards for February. Farhan's World Cup performance, including two centuries, secured his win. Reddy's impressive T20 series against Australia led to her victory.
टॅग्स :आयसीसीभारतीय महिला क्रिकेट संघपाकिस्तान