ICC ODI World Cup PAK vs ENG Live : पाकिस्तान संघाचा वर्ल्ड कप स्पर्धेतील प्रवास अखेर संपुष्टात आला. इंग्लंडने विजयासाठी ठेवलेले ३३८ धावांचे लक्ष्य त्यांनी ६.४ षटकांत पार केले असते तर पाकिस्तान उपांत्य फेरीत पोहोचला असता. पण, त्यांना ७ षटकांत २ बाद ३० धावाच करता आल्या आणि ते स्पर्धेबाहेर फेकले गेले. आता त्यांना कोलकाताहूनच थेट परतीचं विमान पकडावे लागणार आहे. त्यामुळे उपांत्य फेरीत १५ नोव्हेंबरला भारत-न्यूझीलंड ( मुंबई) आणि १६ नोव्हेंबरला ऑस्ट्रेलिया-दक्षिण आफ्रिका ( कोलकाता) अशा लढती होतील.

डेवीड मलान ( ३१) व जॉनी बेअरस्टो ( ५९) यांनी ८२ धावांची भागीदारी केली. जो रूट व बेन स्टोक्स यांनी तिसऱ्या विकेटसाठी १३१ चेंडूंत १३२ धावांची भागीदारी केली. मागील सामन्यातील शतकवीर स्टोक्सने आज ७६ चेंडूंत ११ चौकार व २ षटकारांसह ८४ धावा चोपल्या. जो रूटही ७२ चेंडूंत ६० धावांवर शाहीनच्या गोलंदाजीवर बाद झाला. जॉस बटलर आणि हॅरी ब्रुक यांनी २६ चेंडूंत ४२ धावांची भागीदारी केली. ब्रुकने १७ चेंडूंत ३० धावा कुटल्या. बटलर १७ चेंडूंत २७ धावांवर रन आऊट झाला. इंग्लंडने ५० षटकांत ९ बाद ३३७ धावा केल्या.
पाकिस्तानची मागील ६ वन डे वर्ल्ड कपमधील कामगिरी
२००३ - उपांत्य फेरीसाठी पात्र नाही
२००७ - उपांत्य फेरीसाठी पात्र नाही
२०११ - उपांत्य फेरीत पराभव
२०१५ - उपांत्य फेरीसाठी पात्र नाही
२०१९ -उपांत्य फेरीसाठी पात्र नाही
२०२३ - उपांत्य फेरीसाठी पात्र नाही