ICC ODI World Cup PAK vs AFG Live : पाकिस्तान संघाच्या खेळात काही सुधारणा झाल्याचे दिसत नाहीए. त्यांची फिल्डींग पाहून मुख्य प्रशिक्षक ऑर्थर यांनीही डोक्यावर हात मारल्याचे आज पाहायला मिळाले. त्यात अफगाणिस्तानकडून मिळालेल्या अनपेक्षित प्रतिउत्तरातून बाबर आजम अँड टीम गांगरली. हॅरीस रौफचे ( Haris Rauf) तर अफगाणिस्तानचा सलामीवीर हरमनुल्लाह गुरबाज ( Rahmanullah Gurbaz) याने दणक्यात स्वागत केले. ऑस्ट्रेलियाविरुद्ध पहिल्या षटकात २४ धावा देणाऱ्या रौफने आज अफगाणिस्तानला १७ धावा दिल्या.
पाकिस्तानच्या संघाला आज सूर गवसला. इमाम-उल-हक ( १७) आणि अब्दुल्लाह शफिक ( ५८) यांच्या चांगल्या सुरुवातीनंतरही पाकिस्तानच्या मधल्या फळीने आज निराश केले होते. पण, सौद शकिल ( २५) व बाबर आजम यांनी गाडी रुळावर आणली. बाबरला शादाब खानने चांगली साथ दिली. बाबर ९२ चेंडूंत ४ चौकार व १ षटकारांच्या मदतीने ७४ धावांवर झेलबाद झाला. ४२व्या षटकात बाबर बाद झाला तेव्हा पाकिस्तानच्या २०६ धावा होत्या आणि त्यानंतर इफ्तिखार व शादाब यांनी चांगली फटकेबाजी केली. या दोघांनी ४५ चेंडूंत ७३ धावांची भागीदारी केली आणि इफ्तिखार २७ चेंडूंत २ चौकार व ४ षटकारांच्या आतषबाजीसह ४० धावांवर झेलबाद झाला. शादाबने ३७ चेंडूंत ४० धावा केल्या आणि पाकिस्तानला ७ बाद २८२ धावांवर समाधान मानावे लागले.