Join us

श्रेयस अय्यरने वर्ल्ड कपमधील उत्तुंग षटकार खेचला, रितिका, धनश्री त्यांच्या जागेवरून पळून गेल्या, Video

ICC ODI World Cup India vs Sri Lanka Live : वर्ल्ड कपमध्ये मुंबईत खेळल्या जाणाऱ्या श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात टीम इंडियाचा मधल्या फळीतील फलंदाज श्रेयस अय्यरने तुफानी फटकेबाजी केली.

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 2, 2023 19:03 IST

Open in App

ICC ODI World Cup India vs Sri Lanka Live : वर्ल्ड कपमध्ये मुंबईत खेळल्या जाणाऱ्या श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात टीम इंडियाचा मधल्या फळीतील फलंदाज श्रेयस अय्यरने तुफानी फटकेबाजी केली. अय्यरने मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर वर्ल्ड कप स्पर्धेत स्टँडच्या दिशेने १०६ मीटरपैकी सर्वात लांब षटकार मारला. जिथे युझवेंद्र चहलसोबत रोहित शर्माची पत्नी रितिका सजदेह, चहलची पत्नी धनश्री आणि आर. अश्विनची पत्नी प्रीती अश्विन बसली होती. अय्यरचा शॉट त्यांच्या दिशेने येताना पाहून रितिका आणि धनश्री त्यांच्या जागेवरून उठल्या आणि पळू लागल्या. त्यानंतर चेंडू स्टँडच्या भिंतीवर आदळला. हा व्हिडिओ आयसीसीने पोस्ट केला आहे. 

श्रीलंकेसमोर भारताच्या १९६ धावांमध्ये तीन विकेट पडल्या होत्या. यानंतर चौथ्या क्रमांकावर खेळत असलेल्या अय्यरने मोठे फटके मारले. डावाच्या ३६व्या षटकात कसून रजिताच्या चौथ्या चेंडूवर अय्यरने दमदार शॉट मारला. त्याने मारलेला हा फटका स्टँडच्या दिशेने गेला, जिथे रितिका आणि धनश्री बसल्या होत्या. चेंडू त्यांच्या दिशेने येताना पाहून दोघीही आपापल्या जागेवरून पळू लागले.  

रोहित शर्मा ( ४ धावा) लवकर बाद झाल्यानंतर शुभमन गिल ( ९२ धावा) आणि विराट कोहली (८८धावा) यांच्यात दुसऱ्या विकेटसाठी १८९ धावांची भागीदारी झाली. यानंतर श्रेयस अय्यरने ५६ चेंडूंत तीन चौकार आणि सहा षटकारांसह ८२ धावांची स्फोटक खेळी केली. भारताने ५० षटकांत ८ बाद ३५७ धावा केल्या.

टॅग्स :वन डे वर्ल्ड कपश्रेयस अय्यरभारत विरुद्ध श्रीलंका