विराट कोहली, शुबमन गिल, श्रेयस अय्यर यांचे शतक हुकले; पण, टीम इंडियाची ट्रिपल सेंच्युरी

ICC ODI World Cup India vs Sri Lanka Live : विराट कोहली ( Virat Kohli), शुबमन गिल आणि श्रेयस अय्यर यांच्या फटकेबाजीने वानखेडे स्टेडियम दणाणून निघाले.

By ऑनलाइन लोकमत | Published: November 2, 2023 06:01 PM2023-11-02T18:01:53+5:302023-11-02T18:05:27+5:30

whatsapp join usJoin us
ICC ODI World Cup IND vs SL Live :  Shubman Gill ( 92), Virat Kohli ( 88), Shreyas Iyer ( 82), Three hundreds missed by Indian batters, team india scored 357/8  | विराट कोहली, शुबमन गिल, श्रेयस अय्यर यांचे शतक हुकले; पण, टीम इंडियाची ट्रिपल सेंच्युरी

विराट कोहली, शुबमन गिल, श्रेयस अय्यर यांचे शतक हुकले; पण, टीम इंडियाची ट्रिपल सेंच्युरी

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

ICC ODI World Cup India vs Sri Lanka Live : विराट कोहली ( Virat Kohli), शुबमन गिल आणि श्रेयस अय्यर यांच्या फटकेबाजीने वानखेडे स्टेडियम दणाणून निघाले. विराट व शुबमन या दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी १८९ धावांची भागीदारी करून श्रीलंकेला हतबल केले. पण, दोघंही शतकाच्या तोंडावर बाद झाले. विराटला आज वन डेतील ४९वे शतक झळकावून सचिन तेंडुलकच्या विश्वविक्रमाची बरोबरीची संधी होती, परंतु १२ धावांनी ती हुकली. शुबमनचेही शतक ८ धावांनी चुकले. त्यामुळे प्रेक्षक काहीसे निराश झाले, परंतु श्रेयस अय्यरने शतकाचे स्वप्न दाखवले. मात्र, या तिघांना श्रीलंकेच्या दिलशान मदुशंकाने ( ५-८०) शतकाच्या तोंडावर बाद केले. पण, भारताने त्रिशतक पूर्ण झाले. २०१९च्या वर्ल्ड कपनंतर भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करताना सर्वाधिक १८ वेळा तीनशेपार धावा उभ्या केल्या आहेत.

आधी मिठी अन्...! विराट कोहलीने मैदानावर उतरून मोडला सचिन तेंडुलकरचा मोठा विक्रम, Video  

कर्णधार रोहित शर्मा ( ४) दुसऱ्याच चेंडूवर त्रिफळाचीत झाल्यानंतर विराटच्या ( Virat Kohli) जयघोषाने वानखेडे दणाणून निघाले. विराट-शुबमन यांच्या भागीदारीने श्रीलंकेच्या गोलंदाजांना बॅकफूटवर फेकले. या दोघामध्ये शतक पहिलं कोण झळकावतो याची शर्यत. पण, शुबमन ९२ चेंडूंत ११ चौकार व २ षटकारांसह ९२ धावांवर बाद झाला आणि विराटसह त्याची १८९ धावांची भागीदारी संपुष्टात आली. टाळ्यांच्या कडकडाटात प्रेक्षकांनी शुबमनचे कौतुक केले. मग सर्वांना विराटच्या शतकाची आतुरता  होती, परंतु मदुशंकाने त्यालाही शतकापासून वंचित ठेवले. विराट ९४ चेंडूंत ११ चौकारांसह ८८ धावांवर बाद झाला. विराटला दुसऱ्यांदा ४९व्या शतकाने थोडक्यात हुलकावणी दिली.

Image
लोकेश राहुल व श्रेयस अय्यर यांनी चांगली फटकेबाजी करून ४७ चेंडूंत ६० धावा जोडल्य. लोकेश २१ धावांवर बाद झाला. सूर्यकुमार यादवने ( १२) आज पुन्हा निराश केले आणि मदुशंकाच्या स्लोव्ह बाऊन्सवर चेंडू सूर्याच्या ग्लोव्हजला हलका घासून यष्टिरक्षकाच्या हाती विसावला. या सामन्यात ४ बळी घेऊन मदुशंका या वर्ल्ड कपमध्ये सर्वाधिक १७ विकेट्स घेणारा गोलंदाज बनला. वर्ल्ड कपमध्ये भारताविरुद्ध ४ विकेट्स घेणारा मदुशंका हा श्रीलंकेचा पहिला गोलंदाज ठरला. यापूर्वी १९९६मध्ये सनथ जयसूर्याने इडन गार्डनवर १२ धावांत ३ विकेट्स घेतल्या होत्या.  

Image
श्रेयस अय्यरने घरच्या मैदानावर उल्लेखनीय फटकेबाजी केली. ४८व्या षटकात मदुशंकाला त्याने मारलेल्या षटकाराचा आवाज खणखणीत होता. पण, मदुशंकाने चांगले पुनरागमन केले आणि सामन्यातील पाचवी विकेट घेताना श्रेयसला बाद केले. श्रेयसने ५६ चेंडूंत ३ चौकार व ६ षटकारांसह ८२ धावांची वादळी खेळी केली आणि रवींद्र जडेजासह ३६ चेंडूंत ५७ धावा जोडल्या.  जडेजाने २४ चेंडूंत ३५ धावा करून भारताला ८ बाद ३५७ धावांपर्यंत पोहोचवले. 

Web Title: ICC ODI World Cup IND vs SL Live :  Shubman Gill ( 92), Virat Kohli ( 88), Shreyas Iyer ( 82), Three hundreds missed by Indian batters, team india scored 357/8 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.