Join us

नादच खुळा! २२ हजाराचं तिकीट काढून सांगलीच्या खेराडे विटा इथले शेतकरी वानखेडेला पोहचले

ICC ODI World Cup India vs Sri Lanka Live : वन डे वर्ल्ड कप स्पर्धेतील अपराजित भारतीय संघ आज मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर श्रीलंकेचा सामना करायला मैदानावर उतरला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 2, 2023 14:13 IST

Open in App

ICC ODI World Cup India vs Sri Lanka Live : वन डे वर्ल्ड कप स्पर्धेतील अपराजित भारतीय संघ आज मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर श्रीलंकेचा सामना करायला मैदानावर उतरला आहे. २०११ मध्ये याच ऐतिहासिक स्टेडियमवर महेंद्रसिंग धोनीने खणखणीत षटकार खेचून श्रीलंकेला पराभूत करून वर्ल्ड कप उंचावला होता. या सामन्यात श्रीलंकेने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. ही मॅच जिंकून भारतीय संघ उपांत्य फेरीतील स्थान अधिकृतपणे निश्चित करण्याच्या निर्धाराने आज खेळणार आहे. हा क्षण याची देही याची डोळा अनुभवण्यासाठी सांगलीच्या खेराडे विटा येथील ४ शेतकरी वानखेडे स्टेडियमवर पोहोचले आहेत. 

भारतीय संघाने सलग ६ सामने जिंकून १२ गुणांसह उपांत्य फेरीच्या उंबरठ्यापर्यंत झेप घेतली आहे आणि आजचा विजय त्यांच्या अंतिम ४ मधील जागेवर शिक्कामोर्तब करणारा ठरणार आहे. रोहित शर्मा म्हणाला, आम्हालाही प्रथम फलंदाजी करायची होती आणि फलंदाजीसाठी खेळपट्टी पोषक आहे. सुरुवातीला गोलंदाजांना काही मदत नक्की मिळेल, परंतु प्रकाशझोतात आमचे गोलंदाज चांगली कामगिरी करेल. कर्णधार म्हणून घरच्या मैदानावर पहिलाच सामना खेळताना अभिमान वाटतोय.''

भारतीय संघाची ही मॅच पाहण्यासाठी सांगलीचे ४ शेतकरी प्रत्येकी २२ हजारांचे तिकीट खरेदी करून वानखेडेवर पोहोचले. गणेश साळुंखे, सोमनाथ महाडिक, राजेश महाडिक अशी यापैकी तिघांची नावे आहेत आणि यांनी प्रत्येकी २२ हजार अशी ४ तिकिटं खरेदी केली. त्यांनी स्टेडियमवरून व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट केला आणि त्यात त्यांना झालेला आनंद दिसत होता. 

भारत - रोहित शर्मा, शुबमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, लोकेश राहुल, सूर्यकुमार यादव, रवींद्र जडेजा, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज  

श्रीलंका - पथूम निसंका, दिमुथ करुणारत्ने, कुसल मेंडिस, सदीरा समराविक्रमा, चरिथ असलंका, अँजेलो मॅथ्यूज, दुशन हेमंथा, महिश थिक्षणा, कसून रजिथा, दुष्मंथा चमिरा, दिलशान मधुशंका  

टॅग्स :वन डे वर्ल्ड कपभारत विरुद्ध श्रीलंकाऑफ द फिल्डसांगली