Join us

विराट कोहली 'भोपळ्या'वर बाद झाला, शुबमन गिलचा दांडा उडाला; इंग्लंडचा दबदबा, Video  

ICC ODI World Cup IND vs ENG Live :  वन डे वर्ल्ड कप स्पर्धेत अपराजित राहिलेला भारतीय संघ आज प्रथमच प्रतिस्पर्धी संघासमोर लक्ष्य ठेवणार आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 29, 2023 14:48 IST

Open in App

ICC ODI World Cup IND vs ENG Live :  वन डे वर्ल्ड कप स्पर्धेत अपराजित राहिलेला भारतीय संघ आज प्रथमच प्रतिस्पर्धी संघासमोर लक्ष्य ठेवणार आहे. आतापर्यंत झालेल्या ५ सामन्यांत भारताने लक्ष्याचा पाठलाग केला होता आणि आज त्यांना इंग्लंडने प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले. इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात आर अश्विनला संधी मिळेल अशी अपेक्षा होती, परंतु संघात कोणताच बदल करण्यात आलेला नाही. आतापर्यंत अपयशी ठरलेल्या इंग्लंडचा खेळ भारताविरुद्ध उंचावलेला पाहायला मिळाला. तगडे लक्ष्य उभं करण्याचं दडपण घेऊन भारतीय फलंदाज मैदानावर उतरले आण ख्रिस वोक्सने चौथ्या षटकात अप्रतिम चेंडूवर शुबमन गिलचा ( ९) त्रिफळा उडवला. विराट कोहली मैदानावर येताच एकच जल्लोष झाला, परंतु त्याला ८ चेंडूंत एकही धाव इंग्लंडच्या गोलंदाजांनी करू दिली नाही. इंग्लंडच्या क्षेत्ररक्षकांनी अप्रतिम कामगिरी करून विराटवरील दडपण वाढवले. त्यामुळे विराटकडून चुकीचा फटका खेळला गेला आणि डेव्हिड विलीच्या गोलंदाजीवर मिड ऑफला बेन स्टोक्सने सहज झेल घेतला. विराट भोपळ्यावर माघारी परतला. भारतीय संघ - रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, लोकेश राहुल, सूर्यकुमार यादव, रवींद्र जडेजा, जसप्रीत बुमराह, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज.  

टॅग्स :वन डे वर्ल्ड कपभारत विरुद्ध इंग्लंडविराट कोहलीशुभमन गिल