IND vs AFG Live : जसप्रीत बुमराहने सेलिब्रेशनची स्टाईल बदलली; स्टार खेळाडूची कॉपी मारली, Video 

ICC ODI World Cup India vs Afghanistan Live :अफगाणिस्तानविरुद्धच्या लढतीत भारतीय संघ प्लेइंग इलेव्हनमध्ये एक बदल करून मैदानावर उतरला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: October 11, 2023 02:45 PM2023-10-11T14:45:48+5:302023-10-11T14:49:52+5:30

whatsapp join usJoin us
ICC ODI World Cup IND vs AFG Live : India lose the review! Marcus Rashford celebration by Jasprit Bumrah when he gets Ibrahim Zadran, Video  | IND vs AFG Live : जसप्रीत बुमराहने सेलिब्रेशनची स्टाईल बदलली; स्टार खेळाडूची कॉपी मारली, Video 

IND vs AFG Live : जसप्रीत बुमराहने सेलिब्रेशनची स्टाईल बदलली; स्टार खेळाडूची कॉपी मारली, Video 

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

ICC ODI World Cup India vs Afghanistan Live : वन डे वर्ल्ड कप स्पर्धेत अफगाणिस्तानविरुद्धच्या लढतीत भारतीय संघ प्लेइंग इलेव्हनमध्ये एक बदल करून मैदानावर उतरला आहे. जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज यांनी चांगला मारा करताना अफगाणिस्तानच्या धावगतीला वेसण घातले आहे. जसप्रीतने त्याच्या चौथ्या षटकात अफगाणिस्तानला धक्का दिला आणि अनोखं सेलिब्रेशन केलं. त्याने स्टार खेळाडूच्या सेलिब्रेशनची कॉपी केली. 


भारतीय संघ वन डे वर्ल्ड कप स्पर्धेतील दुसऱ्या सामन्यात अफगाणिस्तानचा सामना करतोय. अफगाणिस्तानने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. भारतीय संघाने आर अश्विनला आज विश्रांती देताना शार्दूल ठाकूरला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळवण्याचा निर्णय घेतला आहे. मोहम्मद सिराजने चौथ्या षटकात अफगाणिस्तानचा सलामीवीर इब्राहिम झाद्रानसाठी DRS घेतला, परंतु तो वाया गेला. स्लीपमध्ये उभा असलेला विराट कोहली LBW असल्याचे दाव्याने म्हणत होता आणि रोहितने DRS घेतला. पण, रिप्लेत चेंडू स्टम्पवर आदळत नसल्याचे स्पष्ट झाले अन् भारताला रिव्ह्यू गमवावा लागला.  ७व्या षटकात जसप्रीत बुमराहने अफगाणिस्थानला पहिला धक्का दिला. इब्राहिम झाद्रान २२ धावांवर झेलबाद झाला. 


 


जसप्रीतने इंग्लंडचा स्टार फुटबॉलपटू मार्कस रशफोर्ड याची स्टाईल कॉपी केली. २४ वर्षीय रशफोर्ड इंग्लिश प्रीमिअर लीगमध्ये मँचेस्टर युनायटेडकडून खेळतो.   

Image

Web Title: ICC ODI World Cup IND vs AFG Live : India lose the review! Marcus Rashford celebration by Jasprit Bumrah when he gets Ibrahim Zadran, Video 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.