डेव्हिड वॉर्नरचे सलग दुसरे शतक! सचिन तेंडुलकरच्या विक्रमाशी बरोबरी, रोहित शर्माला देणार टक्कर 

ICC ODI World Cup AUS vs NED Live : डेव्हिड वॉर्नरने वन डे वर्ल्ड कप स्पर्धेत सलग दुसरे शतक झळकावले आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: October 25, 2023 05:08 PM2023-10-25T17:08:02+5:302023-10-25T17:08:41+5:30

whatsapp join usJoin us
ICC ODI World Cup AUS vs NED Live : HUNDRED BY DAVID WARNER, became a 3rd player with 6+ World Cup hundreds  | डेव्हिड वॉर्नरचे सलग दुसरे शतक! सचिन तेंडुलकरच्या विक्रमाशी बरोबरी, रोहित शर्माला देणार टक्कर 

डेव्हिड वॉर्नरचे सलग दुसरे शतक! सचिन तेंडुलकरच्या विक्रमाशी बरोबरी, रोहित शर्माला देणार टक्कर 

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

ICC ODI World Cup AUS vs NED Live : डेव्हिड वॉर्नरनेवन डे वर्ल्ड कप स्पर्धेत सलग दुसरे शतक झळकावले आहे. पाकिस्तानपाठोपाठ त्याने आज नेदरलँड्सच्या गोलंदाजांची धुलाई करताना ९१ चेंडूंत शतक झळकावले. वन डे क्रिकेटमधील हे त्याचे २२वे शतक ठरले. वन डे वर्ल्ड कप स्पर्धेत ऑस्ट्रेलियाकडून सलग दोन शतकं झळकावणारा तो चौथा फलंदाज ठरला. मार्क वॉ ( १९९६), रिकी पाँटिंग ( २००३-२००७), मॅथ्यू हेडन ( २००७) यांनी असा पराक्रम केला आहे.  


अडखळत्या सुरुवातीनंतर सूर गवसलेल्या ऑस्ट्रेलियन संघाने आज वन डे वर्ल्ड कप स्पर्धेत नेदरलँड्सच्या गोलंदाजांना चोप दिला. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा ऑस्ट्रेलियाने निर्णय घेतला. मिचेल मार्श ( ९) चौथ्या षटकात माघारी परतल्यानंतर डेव्हिड वॉर्नर व स्टीव्ह स्मिथ या अनुभवी जोडीने चांगली फटकेबाजी केली. दोघांनी वैयक्तिक अर्धशतकासह ११८ चेंडूंत १३२ धावांची भागीदारी केली. स्मिथ ६८ चेंडूंत ९ चौकार व १ षटकारासह ७१ धावांवर झेलबाद झाला. वर्ल्ड कप स्पर्धेतील स्मिथने १०व्यांदा ५०+ धावा केल्या आहेत. रिकी पाँटिंग ( ११) या लिस्टमध्ये टॉपला आहे. स्मिथने आज अॅडम गिलख्रिस्ट, डेव्हिड वॉर्नर ( ९) यांना मागे टाकले.

 


वॉर्नरने आणखी एका शतकाच्या दिशेने वाटचाल करताना विक्रम नोंदवले. मार्नस लाबुशेनने आज आक्रमक पवित्रा आजमावला आणि ४२ चेंडूंत अर्धशतक पूर्ण केले. वॉर्नरसोबत त्याची जोडी चांगलीच जमलेली पाहायला मिळाली आहे. ऑस्ट्रेलियाकडून चौथ्या क्रमांकावर वर्ल्ड कपच्या १० इनिंग्जनंतर अर्धशतक झळकावणारा लाबुशेन पहिलाच फलंदाज ठरला. २०१९मध्ये स्टिव्ह स्मिथने ( ७३) श्रीलंकेनविरुद्ध या क्रमांकावर अर्धशतक झळकावले होते.  लाबुशेन ४७ चेंडूंत ६२ धावांवर बाद झाला आणि वॉर्नरसोबत ८४ धावांची भागीदारी संपुष्टात आली. वॉर्नरने वन डे वर्ल्ड कप स्पर्धेच्या इतिहासात सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूंमध्ये पाचवे स्थान पटाकवले. त्याने १३००* धावांचा टप्पा ओलांडून रोहित शर्माला ( १२८९) मागे टाकले. 


वर्ल्ड कप स्पर्धेत ६ किंवा त्यापेक्षा अधिक शतक झळकावणारा तो तिसरा फलंदाज ठरला आहे. रोहित शर्माने सर्वाधिक ७ शतकं झळकावली आहेत. सचिन तेंडुलकर व वॉर्नर यांच्या नावावर प्रत्येकी ६ शतकं आहेत.  
 

Web Title: ICC ODI World Cup AUS vs NED Live : HUNDRED BY DAVID WARNER, became a 3rd player with 6+ World Cup hundreds 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.