अझमतुल्लाह ओमारझाई नाबाद ९७, अफगाणिस्ताची फाईट; क्विंटन डी कॉकचा रेकॉर्ड

ICC ODI World Cup  AFG vs SA Live  : अफगाणिस्तानचे वन डे वर्ल्ड कप स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले. पण, आज अखेरच्या साखळी सामन्यात दक्षिण आफ्रिकेला कडवी टक्कर दिली.

By ऑनलाइन लोकमत | Published: November 10, 2023 06:06 PM2023-11-10T18:06:11+5:302023-11-10T18:06:33+5:30

whatsapp join usJoin us
ICC ODI World Cup  AFG vs SA Live  : AZMATULLAH OMARZAI  97 (107) with 7 fours and 3 sixes, AFG all out 244. Quinton de Kock becomes only the third WK to take 6+ catches in a single World Cup game! | अझमतुल्लाह ओमारझाई नाबाद ९७, अफगाणिस्ताची फाईट; क्विंटन डी कॉकचा रेकॉर्ड

अझमतुल्लाह ओमारझाई नाबाद ९७, अफगाणिस्ताची फाईट; क्विंटन डी कॉकचा रेकॉर्ड

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

ICC ODI World Cup  AFG vs SA Live  : अफगाणिस्तानचेवन डे वर्ल्ड कप स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले. पण, आज अखेरच्या साखळी सामन्यात दक्षिण आफ्रिकेला कडवी टक्कर दिली. अझमतुल्लाह ओमारझाई ने ( नाबाद ९७ ) उल्लेखनीय फलंदाजी करून आफ्रिकेसमोर आव्हानात्मक लक्ष्य उभे केले. पण, अफगाणिस्तानला आज उपांत्य फेरीचं गणित सोडवण्यात अपयश आले अन् न्यूझीलंडचे चौथे स्थान अधिक मजबूत झाले. अफगाणिस्तानचे ६ फलंदाज ११६ धावांत माघारी परतले होते, परंतु त्यांच्या शेवटच्या फळीने १००+ धावा जोडल्या. वर्ल्ड कप स्पर्धेत प्रथमच प्रतिस्पर्धी संघाने सहा विकेट्स गमावूनही शेवटच्या फळीसह आफ्रिकेविरुद्ध १०० हून अधिक धावा चोपल्या.  

Image
अफगाणिस्तानने या वर्ल्ड कपमध्ये आतापर्यंतची सर्वोत्तम कामगिरी नोंदवली. ८ सामन्यांत त्यांनी ४ विजय मिळवून स्वतःला उपांत्य फेरीच्या शर्यतीत कायम ठेवले, परंतु नेट रन रेटमध्ये त्यांनी मार खाल्ला. रहमनुल्लाह गुरबाज ( २५) व इब्राहिम झाद्रान ( १५) यांनी मोठी खेळी केली नसली तरी त्यांनी सहकाऱ्यांसाठी एक वातावरण तयार करून दिले. रहमत शाह ( २६) याच्या विकेटने आफ्रिकेने सामन्यात पुनरागमन केले. कर्णधार हशमतुल्लाह शाहिदी ( २), इक्रम अलिखिल ( १२) व मोहम्मद नबी ( २) हे अपयशी ठरले. अफगाणिस्तानच्या पहिल्या सहा विकेट्समध्ये लुंगी एनगिडी व गेराल्ड कोएत्झी यांनी प्रत्येकी २ विकेट्स घेत महत्त्वाचा वाटा उचलला. 


अझमतुल्लाह ओमारझाई आणि राशीद खान यांनी सातव्या विकेटसाठी चांगली खेळी केली. अझमतुल्लाहने या वर्ल्ड कपमधील त्याचे तिसरे अर्धशतक पूर्ण केले. राशीद व ओमारझाई यांची ४४ धावांची भागीदारी अँडिले फेहलुक्वायोने तोडली, राशीद १४ धावांवर झेलबाद झाला. नूर अहमद ( २६) आणि अझमतुल्लाह यांनी ४४ धावांची भागीदारी केली. मुजीब उर रहमान ( ८) बाद झाल्यानंतरही अझमतुल्लाहने एका बाजूने फटकेबाजी सुरूच ठेवली. अफगाणिस्तानने ५० षटकांत २४४ धावा उभ्या केल्या. अझमतुल्लाह १०७ चेंडूंत ७ चौकार व ३ षटकारांसह ९७ धावांवर नाबाद राहिला. ५०व्या षटकात शतकासाठी त्याला ४ धावा हव्या होत्या, परंतु कागिसो रबाडाने त्याला त्या करू दिल्या नाही. 

Image

क्विंटन डी कॉकचा रेकॉर्ड
क्विंटन डी कॉकने आजच्या सामन्यात यष्टींमागे ६ झेल पकडले आणि वर्ल्ड कपमध्ये एकाच सामन्यात ६ किंवा त्यापेक्षा अधिक झेल घेणारा तो तिसरा यष्टीरक्षक ठरला. अॅडम गिलख्रिस्ट ( वि. नामिबिया, २००३) आणि सर्फराज अहमज ( वि. दक्षिण आफ्रिका, २०१५) यांनी अशी कामगिरी केली आहे. वर्ल्ड कप इतिहासात एकाच सामन्यात ५ झेल पडणारा तो सातवा यष्टीरक्षक ठरला.  गिलख्रिस्ट, सर्फराज, रिडली जेकब्स, सय्यद किरमानी, टॉम लॅथम व उमर अकमल यांनी ही कामगिरी केली आहे.  

Web Title: ICC ODI World Cup  AFG vs SA Live  : AZMATULLAH OMARZAI  97 (107) with 7 fours and 3 sixes, AFG all out 244. Quinton de Kock becomes only the third WK to take 6+ catches in a single World Cup game!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.