Join us

एक डायरेक्ट 'हिट', अफगाणिस्तान 'फिट'! नेदरलँड्सचे ४ फलंदाज २४ धावांत रन 'OUT', Video 

ICC ODI World Cup AFG vs NED Live : अफगाणिस्तान आणि नेदरलँड्स यांच्यातला वन डे वर्ल्ड कप स्पर्धेतील सामना कमालीचा चुरशीचा झालेला पाहायला मिळतोय.

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 3, 2023 15:56 IST

Open in App

ICC ODI World Cup AFG vs NED Live : अफगाणिस्तान आणि नेदरलँड्स यांच्यातला वन डे वर्ल्ड कप स्पर्धेतील सामना कमालीचा चुरशीचा झालेला पाहायला मिळतोय. मॅक्स ओडोव ( ४२), कॉलिन एकरमन ( २९) आणि कर्णधार स्कॉट एडवर्ड (०) हे तीन फलंदाज रन आऊट झाल्याने नेदरलँड्सची कोंडी झाली आहे. अझमतुल्लाहच्या एका डायरेक्ट हिटने अफगाणिस्तानला 'फिट' केलं अन् नेदरलँड्सचे ४ फलंदाज २४ धावांत माघारी परतले. या वर्ल्ड कप स्पर्धेत नेदरलँड्सचे सर्वाधिक ८ फलंदाज रन आऊट झालेले आहेत. त्यानंतर भारताचा ( ४) क्रमांक येतो.  

६ पैकी ३ सामने जिंकून उपांत्य फेरीच्या शर्यतीत असणाऱ्या अफगाणिस्तान संघाने आज नेदरलँड्सविरुद्ध चांगले पुनरागमन केले. मुजीब उर रहमानने पहिल्याच षटकात वेस्ली बॅरेसी ( १) याला माघारी पाठवून नेदरलँड्सला धक्का दिला होता. मॅक्स ओडोव आणि कॉलिन एकरमन यांनी दुसऱ्या विकेटसाठी ७० धावांची भागीदारी करून दाव सावरला होता. पण, ही दोन्ही सेट फलंदाज रन आऊट झाली. कर्णधार स्कॉट एडवर्डही ( ०) रन आऊट होऊन माघारी परतला आणि त्यात बॅस डे लीड ( ३) मोहम्मद नबीच्या गोलंदाजीवर बाद झाला. त्यामुळे १ बाद ७३ वरून त्यांची अवस्था ५ बाद ९७ अशी झाली. २४ धावांत ४ विकेट्स ( त्यातल्या तीन रन आऊट ) त्यांनी गमावल्या.

या वर्ल्ड कप स्पर्धेत नेदरलँड्सने पहिल्या २० षटकांत सर्वाधिक ३० विकेट्स गमावल्या आहेत. त्यांनी इंग्लंड ( २६) व बांगलादेश ( २६) यांना माघारी पाठवले. २६व्या षटकात साकिब जुल्फिकार ( ३) ला नूर अहमदने बाद करून नेदरलँड्सची अवस्था ६ बाद ११३ धावा अशी केलीय.

टॅग्स :वन डे वर्ल्ड कपअफगाणिस्तान