IND vs SL : गिलने जिता दिल! थोडक्यात शतक हुकले, पण सारा तेंडुलकरसह साऱ्यांची जिंकली मनं

ICC Odi World Cup 2023 : आज भारत आणि श्रीलंका यांच्यात मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर सामना होत आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: November 2, 2023 04:30 PM2023-11-02T16:30:15+5:302023-11-02T16:30:29+5:30

whatsapp join usJoin us
icc odi world cup 2023 Shubman Gill He missed out a well deserving hundred by just 8 runs played so well but got out for 92 runs Sara Tendulkar appreciate him | IND vs SL : गिलने जिता दिल! थोडक्यात शतक हुकले, पण सारा तेंडुलकरसह साऱ्यांची जिंकली मनं

IND vs SL : गिलने जिता दिल! थोडक्यात शतक हुकले, पण सारा तेंडुलकरसह साऱ्यांची जिंकली मनं

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

IND vs SL Live Match Updates | मुंबई : आज वन डे विश्वचषकात अपराजित भारत आणि श्रीलंका यांच्यात सामना खेळवला जात आहे. मुंबईतील ऐतिहासिक वानखेडे स्टेडियमवर हा सामना होत असून भारतीय संघ सलग सातवा विजय मिळवण्याच्या इराद्याने मैदानात उतरला आहे. प्रथम फलंदाजी करताना डावाच्या पहिल्याच षटकातील दुसऱ्या चेंडूवर भारताला रोहित शर्माच्या (४) रूपात मोठा झटका बसला. पण त्यानंतर शुबमन गिल आणि विराट कोहलीने डाव सावरला. गिल ८ धावांनी शतकाला मुकला पण त्याच्या खेळीने साऱ्यांचीच मनं जिंकली. भारत आणि श्रीलंका हा सामना पाहण्यासाठी अनेक सेलिब्रेटींनी हजेरी लावली. अभिनेत्री आणि लोकेश राहुलची पत्नी अथिया शेट्टी, क्रिकेटपटू युझवेंद्र चहल आणि सचिन तेंडुलकरची मुलगी सारा तेंडुलकर ही देखील कॅमेऱ्यात कैद झाली. गिल बाद झाल्यानंतर चाहत्यांसह साराने देखील अप्रतिम खेळीला दाद दिली.

कर्णधार रोहित बाद झाल्यानंतर गिल आणि कोहलीने सावध खेळी केली. पण दोन्हीही भारतीय शिलेदारांना आपले शतक पूर्ण करता आले नाही. शुबमन गिल ९२ चेंडूत ९२ धावा करून बाद झाला तर विराट कोहली ९४ चेंडूत ८८ धावांवर खेळत असताना शिकार झाला. लक्षणीय बाब म्हणजे रोहित, शुबमन आणि विराट या तिघांना दिलशान मदुशंकाने बाहेरचा रस्ता दाखवला. 

आजच्या सामन्यासाठी भारतीय संघ - 

रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, लोकेश राहुल, सूर्यकुमार यादव, रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह. 

आजच्या सामन्यासाठी श्रीलंकेचा संघ -

कुसल मेंडिस (कर्णधार), पथुम निसांका, दिमुथ करुणारत्ने, सदीरा समरविक्रमा, चरिथ असलंका, अॅंजेलो मॅथ्यूज, दुशान हेमंता, महीश तीक्ष्णा, कसुन रजिथा, दुष्मंता चमीरा, दिलशान मदुशंका. 

Web Title: icc odi world cup 2023 Shubman Gill He missed out a well deserving hundred by just 8 runs played so well but got out for 92 runs Sara Tendulkar appreciate him

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.