SA vs AUS Live : विचित्र विकेट! क्विंटन डी कॉकला नको तो शॉट सूचला, स्वतःनेच स्वतःचा 'त्रिफळा' उडवला, Video 

ICC ODI World Cup 2023 Australia vs South Africa Live : क्विंटन डी कॉक ( Quinton de Kock ) त्याच्या शेवटच्या वन डे वर्ल्ड कप स्पर्धेत सलग दुसऱ्या शतकाची आज नोंद केली.

By ऑनलाइन लोकमत | Published: October 12, 2023 04:55 PM2023-10-12T16:55:53+5:302023-10-12T16:56:16+5:30

whatsapp join usJoin us
ICC ODI World Cup 2023 SA vs AUS Live : Quinton de Kock ( 109) gets tangled before losing his bails, SA 197/3 (34.5 overs), watch Quinton de-Kock Wicket Video  | SA vs AUS Live : विचित्र विकेट! क्विंटन डी कॉकला नको तो शॉट सूचला, स्वतःनेच स्वतःचा 'त्रिफळा' उडवला, Video 

SA vs AUS Live : विचित्र विकेट! क्विंटन डी कॉकला नको तो शॉट सूचला, स्वतःनेच स्वतःचा 'त्रिफळा' उडवला, Video 

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

ICC ODI World Cup 2023 Australia vs South Africa Live : क्विंटन डी कॉक ( Quinton de Kock ) त्याच्या शेवटच्या वन डे वर्ल्ड कप स्पर्धेत सलग दुसऱ्या शतकाची आज नोंद केली. ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांना फैलावर घेताना त्याने ९० चेंडूंत शतक पूर्ण केले आणि टेम्बा बवुमासह पहिल्या विकेटसाठी १०८ धावांची मजबूत भागीदारी केली. पण, चांगली फटकेबाजी करत असताना क्विंटनला नको तो शॉट सूचला अन् त्याने स्वतःच स्वतःच्या पायावर धोंडा मारून घेतला. 

SA vs AUS Live : क्विंटन डी कॉक ऑन फायर! सलग दुसरे शतक झळकावून मोडला १२ वर्षांपूर्वीचा विक्रम

ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. क्विंटन आणि बवुमा यांनी १०८ धावांची सलामी दिली. दोन जीवदान मिळालेल्या बवुमाला ( ३५) अखेर ग्लेन मॅक्सवेलने बाद केले.त्यानंतर व्हॅन डेर ड्यूसेन ( २६) चांगला खेळला, परंतु अॅडम झम्पाने त्याचा अडथळा दूर केला. क्विंटनने ९० चेंडूंत शतक पूर्ण केले आणि एबी डिव्हिलियर्सनंतर ( २०११) वर्ल्ड कपमध्ये सलग दोन शतकं झळकावणारा तो दक्षिण आफ्रिकेचा दुसरा यष्टिरक्षक-फलंदाज ठरला. मॅक्सवेलच्या गोलंदाजीवर रिव्हर्स स्वीप मारण्याचा मोह त्याला नडला.


त्याच्या बॅटचा अन् चेंडूचा संपर्कच झाला नाही आणि चेंडू त्याच्या हाताला लागून यष्टिंवर आदळला. मॅक्सवेलला आयती विकेट मिळाली. क्विंटन १०६ चेंडूंत ८ चौकार व ५ षटकारांसह १०९ धावांवर बाद झाला. 


Web Title: ICC ODI World Cup 2023 SA vs AUS Live : Quinton de Kock ( 109) gets tangled before losing his bails, SA 197/3 (34.5 overs), watch Quinton de-Kock Wicket Video 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.