ICC ODI World Cup 2023 India vs Bangladesh Live : रोहित शर्मा ( Rohit Sharma) आणि बांगलादेश यांच्यात काही तरी कनेक्शन आहे. म्हणूनच वर्ल्ड कप स्पर्धेत जेव्हा बांगलादेशचा संघ समोर असतो तेव्हा रोहितची बॅट वेगाने फटकेबाजी करते. २५७ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करायला मैदैनावर उतरलेल्या रोहितने दोन चौकाराने सुरुवात केली आणि त्यानंतर खणखणीत षटकार खेचला. आशियाई खंडात त्याने वन डेतील ६००० धावा आज पूर्ण केल्या आणि अनेक मोठे विक्रम नावावर केले.
बांगलादेशचे सलामवीर तनझीद हसन ( ५१) व लिटन दास ( ६६) यांनी ९३ धावांची भागीदारी केली. पण, कुलदीप यादवने पहिला धक्का दिल्यानंतर त्यांची गाडी घसरली. नजमूल होसैन शांतो ( ८), मेहिदी हसन मिराज ( ३) अपयशी ठरले. मुश्फिकर रहिम ( ३८) आणि तोवहीद हृदय ( १६) यांची ४२ धावांची भागीदारी तोडली. नसून अहमद ( १४) व महमदुल्लाह २५ चेंडूंत ३२ धावांची भागीदारी केली. महमदुल्लाहने ३६ चेंडूंत ३ चौकार व ३ षटकारांसह ४६ धावा करून बांगलादेशला ८ बाद २५६ धावांपर्यंत पोहोचवले