Join us

IND vs BAN Live : विकेट, इम्पॅक्ट, पिचिंग सर्व बरोबर; तरीही बांगलादेश फलंदाज Not Out! पाहा नेमकं चुकलं कोण 

ICC ODI World Cup 2023 India vs Bangladesh Live : बांगलादेशच्या सलामीवीरांनी आज भारताविरुद्ध आश्चर्यचकित सुरुवात केली.

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 19, 2023 15:17 IST

Open in App

ICC ODI World Cup 2023 India vs Bangladesh Live : बांगलादेशच्या सलामीवीरांनी आज भारताविरुद्ध आश्चर्यचकित सुरुवात केली. तनझीद हसन आणि लिटन दास यांनी सलामीला येताना सुरुवातीची ५ षटकं संथ खेळ केला, परंतु सेट झाल्यावर त्यांनी हात मोकळे करण्यास सुरुवात केली. हसन व लिटन यांनी १३ षटकांत ८४ धावांची भागीदारी करून भारतीय गोलंदाजांना हैराण केले आहे. पण, हसन बाद असूनही मैदानावर एका चुकीमुळे खेळतोय... 

हार्दिक पांड्याला दुखापत, वेदनेने हैराण; सोडले मैदान, विराट कोहलीनं पूर्ण केली ओव्हर

वन डे वर्ल्ड कप स्पर्धेतील विजयी घोडदौड कायम राखण्यासाठी भारतीय संघ पुण्यातील मैदानावर बांगलादेशचा सामना करण्यासाठी उतरला आहे.  बांगलादेशला प्रमुख खेळाडू व कर्णधार शाकिब अल हसन याच्याशिवाय आज खेळावे लागतेय. बांगलादेशने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. रोहितला प्रथम गोलंदाजीच करायची होती. तनझीद हसन आणि लिटन दास यांनी पहिल्या विकेटसाठी चांगली कामगिरी करताना अर्धशतकी भागीदारी केली आहे.  

सामन्याच्या ७व्या षटकात जसप्रीत बुमराहच्या अप्रतिम यॉर्कवर चेंडू तनझीदच्या पायावर जाऊन आदळला... भारतीय खेळाडूंनी जोरदार अपील केले आणि मैदानावरील अम्पायरने नॉट आऊट दिले. या निर्णयाविरोधात कर्णधार रोहित शर्माला DRS घेण्याची संधी होती. पण, आपापसात चर्चा करून तिसऱ्या अम्पायरकडे दाद न मागण्याचा निर्णय घेतला गेला. पण, रिप्लेमध्ये चेंडू पिचिंगमध्ये होता, इम्पॅक्य योग्य होता आणि चेंडू यष्टिंवर आदळत होता... असे दिसले आणि विकेट मिळता मिळता राहिली. भारताने DRS घेतला असता तर तनझीद बाद झाला असता, परंतु त्याने मिळालेल्या संधीचं सोनं केलं अन् ४१ चेंडूंत अर्धशतक झळकावलं.  ( IND vs BAN Live Scoreboard Marathi

टॅग्स :वन डे वर्ल्ड कपभारत विरुद्ध बांगलादेश