Join us

ICC ODI Rankings : पहिल्यांदाच झिम्बाब्वेच्या सिकंदरची 'बादशाहत'; फलंदाजीत गिल-रोहितचा जलवा

. ३९ वर्षीय सिकंदर रझानं ३०२ रेटिंग पॉइंट्स मिळवत दोन स्थानांच्या सुधारणेसह नवा वर्ल्ड नंबर वन होण्याचा डाव साधला.

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 3, 2025 15:32 IST

Open in App

ICC ODI Rankings Update : आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेनं (ICC) जाहीर केलेल्या नव्या वनडे क्रमवारीत झिम्बाब्वेच्या स्टार ऑलराउंडरनं मोठी झेप घेतली आहे.  श्रीलंकेतील मालिकेतील सर्वोत्तम कामगिरीच्या जोरावर सिकंदर रझा हा अष्टपैलू खेळाडूंच्या गटात अव्वलस्थानावर विराजमान झालाय. आपल्या  कारकिर्दीत पहिल्यांदाच त्याने नंबर वनचा ताज पटकवलाय. ३९ वर्षीय सिकंदर रझानं ३०२ रेटिंग पॉइंट्स मिळवत दोन स्थानांच्या सुधारणेसह नवा वर्ल्ड नंबर वन होण्याचा डाव साधला.

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा! 

दोन सामन्यातील सर्वोत्तम कामगिरीच्या जोरावर अष्टपैलूंच्या यादीत पहिल्यांदाच 'सिंकंदर'ची बादशाहत 

सध्याच्या घडीला श्रीलंकेचा संघ झिम्बाब्वेच्या दौऱ्यावर आहे. हरारेच्या मैदानात झालेल्या दोन वनडे सामन्यात सिकंदर रझानं फलंदाजीसह गोलंदाजीत खास छाप सोडलीये. पहिल्या वनडेत त्याने ८७ चेंडूत ९२ धावांची खेळी केली होती. याशिवाय गोलंदाजीत १० षटकात ४८ धावा खर्च करताना त्याने एक विकेटही आपल्या खात्यात जमा केली होती. दुसऱ्या वनडेत त्याच्या भात्यातून ५५ चेंडूत नाबाद ५९ धावांची खेळी पाहायला मिळाली होती. या कामगिरीसह त्याने कारकिर्दीतील सर्वोत्तम रँकिंगला गवसणी घातलीये.

रोहित शर्माची झाली फिटनेस टेस्ट! पास की नापास, काय आला निकाल? संघात स्थान मिळणार?

फलंदाजीत भारतीयांचा बोलबाला!

आयसीसीच्या एकदिवसीय क्रमवारीत शुबमन गिल आणि रोहित शर्मा अनुक्रमे ७८४ आणि ७५६ रेटिंग पॉइंट्स मिळवत पहिल्या आणि दुसऱ्या स्थानावर विराजमान आहेत. पाकिस्तानचा बाबर आझम ७३९ रेटिंगसह तिसऱ्या तर विराट कोहली ७३६ रेटिंगसह चौथ्या स्थानावर आहे. भारतीय संघ चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेनंतर वनडे खेळलेेला नाही. तरीही कुलदीप यादव (६५०) आणि रवींद्र जडेजा (६१६) रेटिंगसह गोलंदाजी क्रमवारीत अनुक्रमे तिसऱ्या आणि नवव्या स्थानावर कायम आहेत.

गोलंदाजीत २ भारतीय टॉप १० मध्ये 

आयसीसीच्या गोलंदाजांच्या क्रमवारीत दक्षिण आफ्रिकेचा केशव महाराजा ६९० रेटिंग पॉइंट्स मिळवत अव्वलस्थानी आहे. त्याच्यापाठोपाठ श्रीलंकेचा महिश तीक्षणा ६५९ रेटिंगसह दुसऱ्या तर कुलदीप यादव ६५० रेटिंगसह तिसऱ्या स्थानावर आहे. रवींद्र जेडेजा एकही मॅच न खेळता एका स्थानाच्या सुधारणेसह ६१६ रेटिंग पॉइंट्स सह आठव्या  स्थानावर पोहचला आहे.

टॅग्स :आयसीसीशुभमन गिलरोहित शर्माविराट कोहलीझिम्बाब्वे