ICC ODI Rankings : आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेनं जाहीर केलेल्या नव्या एकदिवसीय क्रिकेटमधील फलंदाजांच्या क्रमवारीत भारताचा हिटमॅन रोहित शर्मा पुन्हा एकदा अव्वलस्थानी विराजमान झाला आहे. खास गोष्ट ही की, दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या वनडे मालिकेआधी एकही सामना न खेळता रोहित शर्माला एका स्थानाच्या सुधारणेसह पुन्हा नंबर वन फलंदाज ठरला आहे. याआधी न्यूझीलंडच्या डॅरिल मिचेलनं रोहित शर्माचा ताज हिसकावून घेतला होता. पण आठवड्याभरात त्याने हा ताज पुन्हा गमावल्याचे पाहायला मिळत आहे.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
ICC च्या नियमामुळे हिटमॅन रोहित फायद्यात, डॅरिल मिचलला बसला फटका
आयसीसीच्या नियमानुसार, एखादा फलंदाज वनडे संघातून बाहेर असेल तर त्याचा क्रमवारीवर परिणाम होतो. याच नियमाचा डॅरिल मिचेल याला फटका बसला आहे. ICC च्या नवडे क्रमवारीत या नियमाच्या फायद्यासह रोहित शर्मा पूर्वीच्या ७८१ रेटिंग पॉइंट्ससह अव्वलस्थानी आहे. न्यूझीलंडचा संघ काही वनडे सामन्यात डॅरियल मिचेलशिवाय मैदानात उतरला अन् या फलंदाजाच्या रेटिँग पॉइंट्समध्ये घसरण झाली. आता त्याच्या खात्यात ७६६ रेटिंग पॉइंट्स जमा असून तो दुसऱ्या स्थानावर आहे. ICC वनडे क्रमवारीत टॉप १० मधील या बदलाशिवाय अन्य कोणताही मोठा बदल झाल्याचे दिसत नाही.
ICC T20 World Cup 2026 : रोहित शर्मा टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेचा ब्रँड अॅम्बेसेडर!
ICC वनडे रिँकिमध्ये गिल आणि कोहली कितव्या स्थानी?
आयसीसीच्या नवीन एकदिवसीय क्रमवारीत अफगाणिस्तानचा इब्राहिम जादरान हा ७६४ रेटिंग पाँइट्ससह तिसऱ्या स्थानावर कायम आहे. त्याच्या पाठोपाठ शुभम गिल आणि विराट कोहलीचा नंबर लागतो. या दोन्ही भारतीय खेळाडूंच्या खात्यात अनुक्रमे ७४५ आणि ७२५ रेटिंग पॉइंट्स आहेत. गिल दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेला मुकणार असल्यामुळे येत्या काळात त्याच्या क्रमवारीतही घसरण होऊ शकते. याउलट विराट कोहलीला आपले स्थान सुधारण्याची संधी असेल.
श्रेयस अय्यरला फटका
वेस्ट इंडीजचा धडाकेबाज फलंदाज शे होप याने दोन स्थानांची झेप घेत ७०१ रेटिंगसह आठव्या क्रमांकावर पोहचला आहे. श्रेयस अय्यरच्या क्रमवारीत घसरण झाली असून तो ७०० रेटिंग पॉइंट्स सह क्रमवारीत नवव्या आणि श्रीलंकेचा चरित असलंग ६९० रेटिंगसह १० व्या स्थानावर आहे. ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील एकदिवसीय मालिकेत श्रेयस अय्यरला दुखापत झाली होती. परिणामी तो घरच्या मैदानातील दक्षिण आफ्रिके विरुद्धच्या मालिकेला मुकणार असून तो टॉप १० मधून बाहेर पडल्याचे पाहायला मिळू शकते.