Rohit Sharma beat Virat Kohli : रोहित शर्माने इतिहास रचला, विराट कोहलीला मोठा धक्का दिला; Ravindra Jadejaने गमावले नंबर वन स्थान

Rohit Sharma beat Virat Kohli : श्रीलंकेविरुद्धच्या कसोटी मालिकेत २-० असे निर्भेळ यश मिळवून टीम इंडियाने घरच्या मैदानावर सलग १५ वी कसोटी मालिका जिंकण्याचा इतिहास रचला.

By ऑनलाइन लोकमत | Published: March 16, 2022 02:07 PM2022-03-16T14:07:53+5:302022-03-16T14:38:14+5:30

whatsapp join usJoin us
ICC Men's Test Player Rankings : Rohit Sharma is now India's highest ranked Test batsman,Virat Kohli slips to No.9 now; Jason Holder No.1 Test All Rounder | Rohit Sharma beat Virat Kohli : रोहित शर्माने इतिहास रचला, विराट कोहलीला मोठा धक्का दिला; Ravindra Jadejaने गमावले नंबर वन स्थान

Rohit Sharma beat Virat Kohli : रोहित शर्माने इतिहास रचला, विराट कोहलीला मोठा धक्का दिला; Ravindra Jadejaने गमावले नंबर वन स्थान

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

Rohit Sharma beat Virat Kohli : श्रीलंकेविरुद्धच्या कसोटी मालिकेत २-० असे निर्भेळ यश मिळवून टीम इंडियाने घरच्या मैदानावर सलग १५ वी कसोटी मालिका जिंकण्याचा इतिहास रचला. रोहित शर्माने ( Rohit Sharma) पूर्णवेळ भारतीय  संघाच्या नेतृत्वाची जबाबदारी स्वीकारल्यापासून भारतीय संघ एकामागून एक क्लिन स्वीप देत चालले आहेत. याचा फायदा भारतीय खेळाडूंना ICC Men's Test Player Rankings मध्ये झालेला पाहायला मिळतोय. ICC ने बुधवारी जाहीर केलेल्या या क्रमवारीत रोहितने ऐतिहासिक कामगिरी केली. यासह त्याने विराट कोहलीवर ( Virat Kohli) कुरघोडी केली. 

भारत-श्रीलंका दुसऱ्या कसोटीत जसप्रीत बुमराह व दिमुथ करुणारत्ने यांनी उल्लेखनीय कामगिरी केली आणि त्यामुळे ICC Men's Test Player Rankingsमध्ये त्यांनाही फायदा झाला. विराट कोहलीला शतकांचा दुष्काळ संपवता तर आला नाहीच, शिवाय २०१७नंतर प्रथमच कसोटी क्रिकेटमधील त्याची धावांची सरासरी ही ५०च्या खाली गेली. त्यामुळे त्याची ICC Men's Test Player Rankingsमध्ये पाचवरून थेट नवव्या स्थानी घसरण झाली आहे. जसप्रीतने बंगळुरू कसोटीत एकूण ८ विकेट्स घेतल्या होत्या आणि तो आता सहा क्रमांकाच्या सुधारणेसह चौथ्या स्थानावर पोहोचला आहे. त्याने शाहिन आफ्रिदी, कायले जेमिन्सन, टीम साऊदी, जेम्स अंडरसन, नील वॅगनर व जोश हेझलवूड यांना मागे टाकले. 

मोहम्मद शमी १७व्या क्रमांकावर आला आहे, तर श्रीलंकेचा लसिथ एम्बूल्देनिया व प्रविण जयविक्रमा हे पाच स्थानांच्या सुधारणेसह अनुक्रमे ३२ व ४५ व्या क्रमांकावर आले आहेत. पॅट कमिन्स, आर अश्विन व कागिसो रबाडा हे अव्वल तीन क्रमांकावर आहेत. फलंदाजांमध्ये श्रीलंकेचा कर्णधार दिमूथ करुणारत्ने हे तिसऱ्या क्रमांकावर आला आहे. त्याने बंगळुरू कसोटीत १०७ धावांची जीगरबाज खेळी केली होती. पाकिस्तानची कर्णधार बाबर आजम ८व्या क्रमांकावर आला आहे. मार्नस लाबुशेन, जो रूट, स्टीव्ह स्मिथ व केन विलियम्सन हे आघाडीवर आहेत.  

श्रेयस अय्यरने आणखी गरुड भरारी घेताना ३७वे स्थान पटकावले आहे. अय्यरने श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीत ९२ व ६७ धावांची खेळी केली होती. डे नाइट कसोटीत दोन्ही डावात ५०+ धावा करणारा तो भारताचा पहिला फलंदाज ठरला आहे. रोहितला या मालिकेत खास काही करता आले नसले तरी तो सहाव्या क्रमांकावर कायम आहे. पण, भारताकडून सर्वाधिक ७५४ रेटिंग घेणारा तो कसोटी फलंदाज ठरला आहे. त्याने विराटला ( ७४२ ) मागे टाकले. दरम्यान, वेस्ट इंडिजच्या जेसन होल्डरने अष्टपैलू खेळाडूंमध्ये अव्वल स्थान पटकावताना रवींद्र जडेजाला मागे टाकले आहे. 

Web Title: ICC Men's Test Player Rankings : Rohit Sharma is now India's highest ranked Test batsman,Virat Kohli slips to No.9 now; Jason Holder No.1 Test All Rounder

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.