ICC Men's T20 World Cup : सुरू होतोय क्रिकेटचा महासंग्राम; जाणून घ्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कपबाबत सर्वकाही, फक्त एका क्लिकवर

Everything you need to know about the T20 World Cup IPLच्या ग्लॅमरस अंदाजानंतर आता आंतरराष्ट्रीय ट्वेंटी-२० सामन्यांचा महासंग्राम सुरू होत आहे. रविवार दिनांक १७ ऑक्टोबरपासून ICC Men's T20 World Cup  स्पर्धेला सुरुवात होत आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: October 16, 2021 03:46 PM2021-10-16T15:46:29+5:302021-10-16T15:46:53+5:30

whatsapp join usJoin us
ICC Men's T20 World Cup : Everything you need to know about the T20 World Cup, From fixtures to squads to venues to reserve days  | ICC Men's T20 World Cup : सुरू होतोय क्रिकेटचा महासंग्राम; जाणून घ्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कपबाबत सर्वकाही, फक्त एका क्लिकवर

ICC Men's T20 World Cup : सुरू होतोय क्रिकेटचा महासंग्राम; जाणून घ्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कपबाबत सर्वकाही, फक्त एका क्लिकवर

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

ICC Men's T20 World Cup : इंडियन प्रीमिअर लीगचे ( IPL 2021) १४ वे पर्व संपले आणि त्यात चेन्नई सुपर किंग्सनं  ( CSK) जेतेपदाची माळ गळ्यात घातली. IPLच्या ग्लॅमरस अंदाजानंतर आता आंतरराष्ट्रीय ट्वेंटी-२० सामन्यांचा महासंग्राम सुरू होत आहे. रविवार दिनांक १७ ऑक्टोबरपासून ICC Men's T20 World Cup  स्पर्धेला सुरुवात होत आहे. २०१६नंतर प्रथमच होत असलेल्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत जेतेपद कोण पटकावतं, याची सर्वांना उत्सुकता लागली आहे. या स्पर्धेचं वेळापत्रक, संघ, स्थळ, राखीव दिवस आणि आणखी बरचं काही या बातमीतून तुम्हाला जाणून घेता येणार आहे. १६ संघांचा समावेश असलेल्या या स्पर्धेत कोण बाजी मारतं, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

Everything you need to know about the T20 World Cup - ओमान आणि यूएई हे संयुक्तपणे ICC Men's T20 World Cup  स्पर्धेच्या सामन्यांचे यजमानपद भूषवित आहेत. १७ ऑक्टोबरला ओमान क्रिकेट अकादमीपासून सुरू होणारा हा प्रवास १४ नोव्हेंबरला दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर येऊन थांबणार आहे. २०१६मध्ये कार्लोस ब्रेथवेटच्या वादळानं इंग्लंडचा पालापाचोळा केला होता. अखेरच्या षटकात त्यानं बेन स्टोक्सला चार खणखणीत षटकार खेचून वेस्ट इंडिजला जेतेपद पटकावून दिलं होतं आणि सलग दुसऱ्यांदा ICC Men's T20 World Cup  स्पर्धा जिंकणारा तो पहिलाच संघ ठरला होता.

चला तर मग यंदाच्या ICC Men's T20 World Cup स्पर्धेबाबत जाणून घेऊया सर्वकाही...

यंदाची स्पर्धा तीन टप्प्यांत पार पडणार आहे.

  1. Round 1 - या टप्प्यात आठ संघांची दोन गटांत प्रत्येकी ४-४ अशी विभागणी करण्यात आली असून दोन्ही गटांतील अव्वल संघ Super 12 स्टेजसाठी पात्र ठरणार आहेत.  
  2. आयसीसी क्रमवारीतील अव्वल ८ संघांची A व B अशी दोन गटांत विभागणी केली गेली आहे आणि ते थेट Super 12  मध्ये खेळणार आहेत. 
  3. सुपर १२ मधील संघांमध्ये  राऊंड रॉबीन प्रमाणे सहा सामने खेळतील आणि अव्वल दोन संघ उपांत्य फेरीसाठी पात्र ठरतील आणि त्यानंतर फायनल होईल. 

 

गुणपद्धत

  • विजयी संघाला - दोन गुण
  • बरोबरी, अनिर्णित किंवा रद्द झाल्यास - दोन्ही संघांना प्रत्येकी १ गुण
  • पराभूत संघाला - शून्य गुण

 
स्पर्धेसाठी राखीव दिवस आहे का?
उपांत्य फेरीतील व अंतिम फेरीतील सामन्यांसाठी राखीव दिवस ठेवण्यात आले आहे. याव्यतिरिक्त कोणत्याच सामन्याला राखीव दिवस नाही.   

महत्त्वाच्या तारखा

  • १७ ऑक्टोबरला स्पर्धेला सुरुवात - ओमान विरुद्ध पपुआ न्यू गिनी आणि बांगलादेश विरुद्ध स्कॉटलंड असे दोन सामने होतील.  
  • २२ ऑक्टोबर - राऊंड १चे सामने संपतील आणि त्यानंतर २३ ऑक्टोबरला सुपर १२च्या लढतींचा थरार रंगेल
  • २३ ऑक्टोबरला सुपर १२ मध्ये ऑस्ट्रेलिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका आणि इंग्लंड विरुद्ध वेस्ट इंडिज यांच्यात सामना होईल
  • २४ ऑक्टोबरला भारत विरुद्ध पाकिस्तान हे कट्टर प्रतिस्पर्धी खेळतील
  • ८ नोव्हेंबरला सुपर १२चे सामने संपतील 
  • १० व ११ नोव्हेंबरला उपांत्य फेरीचे सामने होतील
  • १४ नोव्हेंबरला अंतिम सामना होईल

 
ग्रुप्स

राऊंड १  
ग्रुप अ -  श्रीलंका, आयर्लंड, नेदरलँड्स, नामिबिया
ग्रुप ब - बांगलादेश, स्कॉटलंड, पापुआ न्यू गिनी, ओमान 

सुपर १२
ग्रुप १ -  इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका, वेस्ट इंडिज, अ गटातील अव्वल, ब गटातील दुसऱ्या क्रमांकाचा संघ
ग्रुप २ - भारत, पाकिस्तान, न्यूझीलंड, अफगाणिस्तान, अ गटातील दुसऱ्या क्रमांकाचा संघ, ब गटातील अव्वल
 


 

संघ

  • श्रीलंका - दासून शनाका, कुसल परेरा, दीनेश चंडीमल, धनंजया डी सिल्व्हा, पाथूम निसंका, चरिथ असालंका, अविष्का फर्नांडो, भानुका राजपक्षा, चमिका करुणारत्ने, वनिंदू हसरंगा, दुष्मंथा चमिरा, लाहिरू कुमारा, महिष थिक्षणा, अकिला धनंजया, बिनुरा फर्नांडो 
  • आयर्लंड - एंडी बालबिर्नी (कर्णधार), मार्क अडायर, कर्टिस कैंफर, डेलनी, डॉकरेल, शेन गेटकेट, ग्राहम कैनेडी, जोश लिटिल, मैकब्राइन, मैककार्थी, केविन ओ’ब्रायन, नील रॉक, सिमी सिंह, पॉल स्टर्लिंग, हैरी टेक्टर, लोर्कन टकर, बेन व्हाइट, क्रेग यंग,
  • नेदरलँड्स - पीटर सीलर (कर्णधार), कॉलिन एकरमैन, फिलिप बोइसेवेन, बेन कूपर, बास डी लीड, स्कॉट एडवर्ड्स, ब्रैंडन ग्लोवर, फ्रेड क्लासेन, स्टीफन मायबर्ग, मैक्स ओ’डॉड, रयान टेन डोएच, लोगान वैन बीक, टिम वैन डेर गुग्टेन, रूलोफ वैन डर मेरवे, पॉल वैन मीकरेन.
  • नामीबिया - गेरहार्ड इरास्मस (कर्णधार), स्टीफन बार्ड, कार्ल बिरकेनस्टॉक, मिचौ डू प्रीज़, जान फ़्रीलिंक, ज़ेन ग्रीन, निकोल लोफ़ी-ईटन, बर्नार्ड शोल्ट्ज़, बेन शिकोंगो, जेजे स्मिट, रूबेन ट्रम्पेलमैन, माइकल वैन लिंगेन, डेविड विस, क्रेग विलियम्स, पिकी या फ्रांस. राखीव खेळाडू मॉरिशस गुपिता
  • बांगलादेश - महमदुल्ला (कर्णधार), नईम शेख, सौम्या सरकार, लिट्टन कुमार दास, शकिब अल हसन, मुशफिकूर रहिम, अफिफ हुसेन, नुरुल हसन सोहन, शाक मेहेदी हसन, नसुम अहमद, मुस्तफिझूर रहमान, शोरिफूल इस्लाम, तस्किन अहमद, सैफ उद्दीन, शमिम हुसेन, राखीव खेळाडू - रुबेल हुसेन आणि अमिनूल इस्लाम बिपलब
  • स्कॉटलंड - काइल कोएत्जर (कर्णधार), रिचर्ड बेरिंगटन (वीसी), डायलन बज, मैथ्यू क्रॉस (विकेटकीपर), जोश डेवी, अलास्डेयर इवांस, क्रिस ग्रीव्स, ओली हेयर्स, माइकल लीस्क, कैलम मैकलियोड, जॉर्ज मुन्से, सफ्यान शरीफ, क्रिस सोल, हमजा ताहिर , क्रेग वालेस (विकेटकीपर), मार्क वाट, ब्रैड व्हील.
  • पपुआ न्यू गिनी - असद वाला (कर्णधार), चार्ल्स अमिनी, लेगा सैका, नॉर्मेन वनुआ, नोसाइना पोकाना, किपलिंग डोरिगा, टोनी उरा, हिरी हिरी, गौड़ी टोका, सेस बाउ, डेमियन रावू, कबुआ वागी-मोरिया, साइमन अताई, जेसन किला, चाड सोपर, जैक गार्डनर.
  • ओमान - जीशान मकसूद (कर्णधार ), आकिब इलियास, जतिंदर सिंह, खावर अली, मोहम्मद नदीम, अयान खान, सूरज कुमार, संदीप गौड़, नेस्टर ढांबा, कलीमुल्लाह, बिलाल खान, नसीम खुशी, सूफियान महमूद, फैयाज बट, खुर्रम खान.
  • इंग्लंड - इऑन मॉर्गन (कर्णधार), मोइन अली, जॉनी बेअरस्टो, जोस बटलर (यष्टीरक्षक), सॅम कुरन, ख्रिस जॉर्डन, लियाम लिव्हिंगस्टोन, डेव्हिड मलान, टायमल मिल्स, आदिल रशिद, जेसन रॉय, डेव्हिड विले, ख्रिस वोक्स, मार्क वूड
  • ऑस्ट्रेलिया - अ‍ॅरोन फिंच ( कर्णधार), अ‍ॅस्टन अ‍ॅगर, पॅट कमिन्स, जोस हेझलवूड, जोस इंग्लिस, मिचेल मार्श, ग्लेन मॅक्सवेल, केन रिचर्ड्सन, स्टीव्ह स्मिथ, मिचेल स्टार्क, मार्कस स्टॉयनिस, मिचेल स्विप्सन, मॅथ्यू वेड, डेव्हिड वॉर्नर, अ‍ॅडम झम्पा, राखीव खेळाडू - डेन ख्रिस्टियन, नॅथन एलिस, डेव्हियन सॅम्स
  • दक्षिण आफ्रिका - टेम्बा बावुमा ( कर्णधार), केशव महाराज, क्विंटन डी कॉक, जॉन फॉर्टुइन, रीजा हेन्ड्रिक्स, हेन्रीक क्लासेन, एडेन मार्करम, डेव्हिड मिलर, म्यूल्डर, लुंगी एन्गिडी, एनरिक नॉर्खिया, ड्वेन प्रीटोरियस, कागिसो रबाडा, तबरेज शम्सी, रॅसी व्हेन डर ड्युसन; राखीव खेळाडू - जॉर्ज लिंडे, एंडिले फेहलुकवायो, लिजाड विलियम्स
  • वेस्ट इंडिज - किरॉन पोलार्ड ( कर्णधार), निकोलस पूरन, ख्रिस गेल, फॅबियन एलेन, ड्वेन ब्राव्हो, रोस्टन चेस, आंद्रे फ्लेचर, शिमरॉन हेटमायर, एव्हीन लुईस, रवी रामपॉल, आंद्रे रसेल, लेंडल सिमन्स, अल्फान्सो थॉमस, हेडन वॉल्श; राखीव खेळाडू - डॅरेन ब्राव्हो, शेल्डन कोट्रेल, जेसन होल्डर, अकील हुसैन
  • भारत - विराट कोहली , रोहित शर्मा, लोकेश राहुल, सूर्यकुमार यादव, रिषभ पंत, इशान किशन, हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, राहुल चहर, आर अश्विन, शार्दूल ठाकूर, वरुण चक्रवर्थी, जसप्रीत बुमराह, भुवनेश्वर कुमार, मोहम्मद शमी 
  • पाकिस्तान - बाबर आझम, आसीफ अली, मोहम्मद हाफिज, शोएब मलिक, मोहम्मद रिझवान, इमाद वासीम, मोहम्मद नवाझ, मोहम्मद वासीम, शाबाद खान, हॅरीस रौफ, हसन अली, शाहिन शाह आफ्रिदी, सर्फराज अहमद, हैदर अली व फाखर झमान 
  • अफगाणिस्तान - राशिद खान, रहमनुल्लाह गुरबाज, हजरतुल्लाह जजाई, उस्मान घानी, असगर अफगान, मोहम्मद नबी (कर्णधार), नजीबुल्लाह जादरान, हशमतुल्लाह शाहिदी, मोहम्मद शहजाद, मुजीब उर रहमान, करीम जन्नत, गुलबदीन नईब, नवीन उल हक, हामिद हसन, शराफुद्दीन अशरफ, दौलत जादरान, शपूर जादरान और कायस अहमद; राखीव खेळाडू - अफसर जजई, फरीद अहमद मलिक.
  • न्यूझीलंड - केन विलियम्सन, टॉड अॅस्टल, ट्रेंट बोल्ट, मार्क चॅपमॅन, डेव्हॉन कॉनवे, ल्युकी फर्ग्युसन, मार्टिन गुप्तील, कायले जेमिन्सन, डॅरील मिचेल, जिमी निशॅम, ग्लेन फिलिप्स, मिचेल सँटनर, टीम सेईफर्ट, इश सोढी, टीम साऊदी, अॅडम मिल्ने 

बक्षीस रक्कम

  • ICC  Men's T20 World Cup prize money - आयसीसीनं जाहीर केलेल्या बक्षीसरकमेनुसार विजेत्या संघाला १.६ मिलियन डॉर म्हणजेच १२.२ कोटी रुपये मिळतील, तर उपविजेत्याला ८,००,००० डॉलर म्हणजेच ६.१ कोटी आणि उपांत्य फेरीतील पराभूत संघांना प्रत्येकी ४,००,००० डॉलर म्हणजे ३ कोटी मिळणार आहेत. या स्पर्धेत एकूण ५.६ मिलियन डॉलर  ( ४२ कोटी )  बक्षीस रक्कमेचे सहभागी १६ संघांमध्ये वाटप केले जाणार आहे.  
  • Prize money announced for the 2021 ICC Men's T20 World Cup सुपर १२मध्ये प्रत्येक सामन्यात विजय मिळवणाऱ्या संघाला बोनस रक्कमही दिली जाणार आहे. २०१६नंतर प्रथमच ट्वेंटी-२० वर्ल्ड कप होत आहे. सुपर १२मध्ये ३० सामने होणार आहेत आणि प्रत्येकी ४० हजार डॉलर म्हणजेच एकूण १२,००,००० लाख डॉलर रक्कम वितरीत केली जाईल.  सुपर १२मधून बाद होणाऱ्या संघाला प्रत्येकी ७० हजार डॉलर मिळणार, म्हणजेच एकूण ५,६०,००० रक्कम दिली जाईल.    
     

Web Title: ICC Men's T20 World Cup : Everything you need to know about the T20 World Cup, From fixtures to squads to venues to reserve days 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.