ICC Men's T20 World Cup 2026 Pakistan vs Netherlands 1st Match : कोलंबो येथील सिंहलीज स्पोर्ट्स क्लबच्या मैदानात रंगलेल्या पाकिस्तान विरुद्ध नेदरलँड्स यांच्यातील लढतीनं टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेला सुरुवात झाली. या सामन्यात नेदरलँड्सच्या संघाने दिलेल्या १४८ धावांचा पाठलाग करताना पाकिस्तानच्या संघाने चांगली सुरुवात केली. पण १० व्या षटकानंतर सामन्यात ट्विस्ट आले. नेदरलँडसचा संघ टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या सलामीच्या लढतीत पाकिस्तानला पराभवाचा दणका देणार असे चित्र निर्माण झाले होते. पण अखेरच्या दोन षटकात नेदरलँड्सच्या ताफ्यातील प्रमुख गोलंदाजाला झालेल्या दुखापतीसह एक कॅच सुटला अन् पाकिस्तानच्या संघाने सुटकेचा निश्वास सोडला. १९ व्या षटकात फहीम अशरफ याने मोठी फटकेबाजी केली अन् शेवटच्या षटकापर्यंत रंगतदार झालेल्या सामन्यात पाकिस्तानच्या संघाने ३ विकेट्स आणि ३ चेंडू राखून रडत खडत विजयी सलामी दिली.
नेदरलँडसच्या संघाने सेट केले होते १४८ धावांचे टार्गेट
पाकिस्तानचा कर्णधार सलमान आगा याने नाणेफेक जिंकून पहिल्यांदा गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. नेदरलँड्सच्या संघाने सलामीवीर मायकेल लेविट २४ (१५) बस डी लीड्स ३०(२५), कॉलिन आर्कमन २० (१४) आणि कर्णधार स्कॉट एडवर्डसच्या २९ चेंडूतील ३७ धावांच्या खेळीच्या जोरावर १९.५ षटकात १४७ धावा केल्या होत्या. पाकिस्तानचा कर्णधार सलमान आगा याने नाणेफेक जिंकून पहिल्यांदा गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. नेदरलँड्सच्या संघाने सलामीवीर मायकेल लेविट २४ (१५) बस डी लीड्स ३०(२५), कॉलिन आर्कमन २० (१४) आणि कर्णधार स्कॉट एडवर्डसच्या २९ चेंडूतील ३७ धावांच्या खेळीच्या जोरावर १९.५ षटकात १४७ धावा केल्या होत्या. गोलंदाजीवेळी पाकिस्तानच्या संघाकडून सलमान मिर्झा याने सर्वाधिक ३ तर मोहम्मद नवाझ, अब्रार अहमद आणि सैम आयूब यांनी प्रत्येकी २-२ विकेट्स घेतल्या.
ज्याचा कॅच सुटला त्यानेच फिरवली मॅच
या धावसंख्येचा पाठलाग करताना सैम अयुब २४ (१३) च्या रुपात पाकिस्तानच्या संघाने २७ धावांवर आपली पहिली विकेट गमावली. त्याची जागा घेण्यासाठी आलेला सलमान आगाही स्वस्तात माघारी फिरला. संघाच्या धावफलवाकर ९८ धावा असताना साहिबजादा ४७ (३१) अर्धशतकाच्या उंबरठ्यावर बाद झाला अन् सामन्यात ट्विस्ट आले. १२ व्या षटकात पाकिस्तानने बाबर आझमसह दोन विकेट्स गमावल्या. ठरविक अंतराने विकेट पडत असल्यामुळे पाकिस्तानचा संघ पराभवाच्या छायेत होता. ३ विकेट्स हातात असताना अखेरच्या १२ चेंडूत पाकिस्तानच्या संघाला २९ धावांची आवशक्यता होती. १९ व्या षटकातील दुसऱ्याच चेंडूवर फहिममचा झेल सुटला. या संधीच सोन करताना याच षटकात २४ धावा करत त्याने सामना पाकिस्तानच्या बाजूनं फिरवला.
Web Summary : Pakistan narrowly defeated the Netherlands in their T20 World Cup opener. A late Netherlands injury and dropped catch proved costly, allowing Pakistan's Fahim Ashraf to secure a tense, three-wicket victory with three balls remaining.
Web Summary : पाकिस्तान ने टी20 विश्व कप के शुरुआती मैच में नीदरलैंड को हराया। नीदरलैंड की एक चूक और छूटे कैच से पाकिस्तान को फहीम अशरफ की मदद से तीन विकेट से जीत मिली, लेकिन यह जीत मुश्किलों भरी रही।