ICC Men's T20 World Cup 2026, India vs New Zealand Final : अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर भारत आणि न्यूझीलंड यांच्यात टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जेतेपदासाठीची लढत रंगली आहे. न्यूझीलंड संघाचा कर्णधार मिचेल सँटनर याने या सामन्यात नाणेफेक जिंकून पहिल्यांदा फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे गत चॅम्पियन भारतीय संघ पहिल्यांदा फलंदाजी करत न्यूझीलंडसमोर टार्गेट सेट करणार आहे.
नाणेफेक गमावल्यावर पुन्हा एकदा सूर्यकुमार यादव समाधानी दिसला. मोठ्या सामन्यात पहिल्यांदा फलंदाजी करणं हे फायद्याचे ठरते, असे वाटते. याआधीही पहिल्यांदा फलंदाजी करताना आम्हाला यश मिळाले आहे. तोच पॅटर्न पुन्हा दिसेल, असे सांगत कोणत्याही बदलाशिवाय मैदानात उतरल्याचे त्याने स्पष्ट केले.
भारतीय संघाने आतापर्यंत दोन वेळा वर्ल्ड कप स्पर्धा जिंकली आहे. कमालीची गोष्ट म्हणजे, दोन्ही वेळा फायनलमध्ये टीम इंडियाने पहिल्यांदा फलंदाजी केली होती. यावेळी नाणेफेकीचा कौल भारताच्या बाजूनं लागला नसला तरी पहिल्यांदा फलंदाजीची संधी मिळाल्यामुळे टीम इंडियासाठी हे शुभ संकेत मानले जात आहे.
भारत प्लेइंग इलेव्हन
अभिषेक शर्मा, संजू सॅमसन (यष्टीरक्षक), ईशान किशन, सूर्यकुमार यादव (कर्णधार), तिलक वर्मा, हार्दिक पांड्या, शिवम दुबे, अक्षर पटेल, वरुण चक्रवर्ती, अर्शदीप सिंग, जसप्रीत बुमराह
न्यूझीलंड प्लेइंग इलेव्हन
टिम सिफर्ट (यष्टीरक्षक), फिन ॲलन, रचिन रवींद्र, ग्लेन फिलिप्स, मार्क चॅपमन, डॅरिल मिचेल, जेम्स नीशम, मिचेल सँटनर (कर्णधार), मॅट हेन्री, लॉकी फर्ग्युसन, जेकब डफी.