Join us
Daily Top 2Weekly Top 5

ICC ODI Rankings : विराट कोहलीला धक्का, नंबर-1 चा ताज काही दिवसांतच गमावला; डॅरिल मिचेल पुन्हा बनला वनडेचा ‘किंग’

ICC Men's ODI Rankings 2026 : भारत आणि न्यूझीलंड दरम्यान नुकत्याच झालेल्या वनडे मालिकेत न्यूझीलंडने २-१ असा विजय मिळवला, या मालिकेत मिचेलची कामगिरी निर्णायक ठरली होती.

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 21, 2026 16:19 IST

Open in App

आयसीसीने (ICC) जाहीर केलेल्या ताज्या वनडे रँकिंगमध्ये मोठा फेरबदल झाला आगे. न्यूझीलंडचा स्टार फलंदाज डॅरिल मिचेलने भारताचा दिग्गज क्रिकेटर विराट कोहलीला मागे टाकत, पहिल्या क्रमांकाचा ताज परिधान केला आहे. भारत आणि न्यूझीलंड दरम्यान नुकत्याच झालेल्या वनडे मालिकेत न्यूझीलंडने २-१ असा विजय मिळवला, या मालिकेत मिचेलची कामगिरी निर्णायक ठरली होती.

या मालिकेत डॅरिल मिचेलने राजकोटमध्ये नाबाद १३१ धावा तर इंदूरमध्ये झालेल्या दुसऱ्या सामन्यात १३७ धावांची जबरदस्त खेली केली होती. या कामगिरीच्या जोरावर तो ८४५ रेटिंगसह पहिल्या स्थानावर पोहोचला. तर विराट कोहली ७९५ गुणांसह दुसऱ्या क्रमांकावर आला आहे. विशेष म्हणजे, मालिकेतील पहिल्या सामन्यानंतर विराटने रोहित शर्माला मागे टाकत पहिले स्थान मिळवले होते, मात्र मालिका संपल्यानंतर, आयसीसीने जारी केलेल्या ताज्या रँकिंगमध्ये कोहलीचा पहिला क्रमांक गेला आणि डॅरिल मिचेल दुसऱ्यांदा पहिल्या क्रमांकावर पोहोचला. यापूर्वी तो नोव्हेंबर २०२५ मध्ये तीन दिवसांसाठी नंबर-१ बनला होता.

ताज्या क्रमवारीत अफगाणिस्तानचा इब्राहिम जादरान ७६४ गुणांसह तिसऱ्या स्थानावर आहे, तर भारतीय कर्णधार रोहित शर्मा एका स्थानाने घसरून चौथ्या क्रमांकावर (७५७ गुण) घसरला आहे. दुसरीकडे, भारतीय गोलंदाजांचा समाचार घेणाऱ्या ग्लेन फिलिप्सने रँकिंगमध्ये १६ स्थानांची मोठी झेप घेत २० व्या क्रमांकावर धडक मारली आहे. फिलिप्सने तिसऱ्या सामन्यात १०६ धावांची खेळी केली होती. याशिवाय, फिलिप्सने अष्टपैलूंच्या (All-rounders) क्रमवारीतही १४ स्थानांची प्रगती करत ३१ वे स्थान गाठले आहे.

ICC ODI रँकिंगच्या टॉप-10 मध्ये केएल राहुल -१. डॅरिल मिचेल : 845 रेटिंग

२. विराट कोहली : 795 रेटिंग

३. इब्राहिम जादरान : 764 रेटिंग

४. रोहित शर्मा : 757 रेटिंग

५. शुभमन गिल : 723 रेटिंग

६. बाबर आजम : 722 रेटिंग

७. हॅरी टेक्टर : 708 रेटिंग

८.शाई होप- 701 रेटिंग

९.चरिथ असलंका- 690 रेटिंग

१०. केएल राहुल- 670 रेटिंग

English
हिंदी सारांश
Web Title : Daryl Mitchell Dethrones Virat Kohli as No. 1 ODI Batsman

Web Summary : Daryl Mitchell's stellar performance in the recent ODI series against India propelled him to the top spot in the ICC rankings, surpassing Virat Kohli. Kohli slips to second, while Rohit Sharma drops to fourth.
टॅग्स :विराट कोहलीभारत विरुद्ध न्यूझीलंडआयसीसीरोहित शर्मा