ICC World Cup Semi Final scenario : आयसीसीवन डे वर्ल्ड कप स्पर्धेचे वेळापत्रक अखेर जाहीर केले गेले. भारत ८ ऑक्टोबरला ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या लढतीने वर्ल्ड कप स्पर्धेच्या मोहीमेला सुरुवात करणार आहे. भारतातील १० वेगवेगळ्या शहरांमध्ये ४६ दिवस ही स्पर्धा रंगणार आहे. ५ ऑक्टोबरला गतविजेता इंग्लंड आणि गत उपविजेता न्यूझीलंड यांच्या लढतीने स्पर्धेची सुरुवात होईल. १५ नोव्हेंबर आणि १६ नोव्हेंबरला उपांत्य फेरीचे सामने अनुक्रमे मुंबई व कोलकाता येथे होतील. भारतीय संघ उपांत्य फेरीत पोहोचला, तर ती मॅच मुंबईत होईल. मात्र, पाकिस्तानमुळे भारताला कोलकातात खेळावे लागू शकते, अशी माहिती आयसीसीने दिली आहे. दोन्ही उपांत्य फेरीच्या सामन्यांना राखीव दिवस ठेवला गेला आहे.

१९ नोव्हेंबरला अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर अंतिम सामना होईल आणि याही सामन्यासाठी राखीव दिवस ठेवला गेला आहे. भारतीय वेळेनुसार दुपारी २ वाजता सर्व सामने सुरू होतील. प्रत्येक संघ साखळी फेरीप्रमाणे ९ सामने खेळणार आणि त्यातील ४ संघ उपांत्य फेरीत प्रवेश करतील. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने दोन सामन्यांची अदलाबदल करण्याची विनंती केली होती, परंतु आयसीसीने ती फेटाळून लावली. २० ऑक्टोबरला त्यांना बंगळुरू येथे ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळावे लागणार आहे. पण, उपांत्य फेरीचा सामना मुंबईत खेळणार नसल्याची त्यांची विनंती मान्य केली गेली आहे.

पहिली उपांत्य फेरीची लढत १५ नोव्हेंबरला मुंबीत होणार आहे आणि दुसरी कोलकाता येथे. दोन्ही सामन्यांसाठी राखीव दिवस ठेवला गेला आहे. भारतीय संघ उपांत्य फेरीत पोहोचला, तर ते मुंबईत खेळतील. पण, जर उपांत्य फेरीत IND vs PAK अशी लढत झाल्यास भारताला कोलकाता येथे खेळावे लागेल, असे ICC ने स्पष्ट केले.