Join us

IND vs NED : भारत-नेदरलँड्स मॅच कधी सुरू होणार? पाऊस थांबला, सुपर सोपर मैदानावर; अपडेट्स वाचा

भारताला दोन सराव सामने खेळायचे होते आणि त्यापैकी गुवाहाटीचा सामना ( वि. इंग्लंड) पावसामुळे रद्द झाला.

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 3, 2023 15:18 IST

Open in App

ICC Cricket World Cup Warm-up Matches IND vs NED : वन डे वर्ल्ड कप स्पर्धा ५ ऑक्टोबरपासून सुरू होतेय आणि भारताचा पहिला सामना ८ ऑक्टोबरला ऑस्ट्रेलियाविरुद्ध होणार आहे. त्यापूर्वी भारताला दोन सराव सामने खेळायचे होते आणि त्यापैकी गुवाहाटीचा सामना ( वि. इंग्लंड) पावसामुळे रद्द झाला. आज तिरुअनंतपूरम येथे नेदरलँड्सविरुद्ध दुसरा सराव सामना भारताला खेळायचा आहे, परंतु त्यातही पावसाने खोडा घातला आहे. दुपारी २ वाजता सुरू होणारा सामना अजूनही सुरू झालेला नाही आणि २.४५ वाजता पाऊस थांबल्याचे अपडेट्स समोर आले. आता सामना कधी सुरू होतोय हे जाणून घेऊया...

भारताने आशिया चषक जिंकून वर्ल्ड कप स्पर्धेच्या तयारीची झलक सर्वांना दाखवून दिली होती. त्यानंतर ऑस्ट्रेलियाविरुद्धची वन डे मालिका २-१ अशी जिंकली. पण, त्या मालिकेतील पहिल्या दोन सामन्यांत रोहित, विराट यांना विश्रांती दिली गेली होती. या अनुभवी खेळाडूंना वर्ल्ड कप पूर्वी सराव मिळावा यासाठी हे दोन सराव सामने महत्त्वाचे होते, परंतु इंग्लंडविरुद्धचा सामना पावसामुळे वाया गेला. आता तिरुअनंतपूरम येथे मागील १६ तासांपासून पाऊस पडतोय. त्यामुळे मैदान ओलं झालं आहे. आता मैदानावर सुपर सॉकर फिरवण्यात येतोय आणि ग्राऊंड्समनही प्रयत्न करत आहेत.

वर्ल्ड कप साठी भारतीय संघ - रोहित शर्मा (कर्णधार), हार्दिक पंड्या (उप कर्णधार), शुबमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, लोकेश राहुल, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, रविचंद्रन अश्विन, इशान किशन, सूर्यकुमार यादव. 

टॅग्स :वन डे वर्ल्ड कपभारत