Join us

PAK vs NZ : मोहम्मद रिझवाननं टॉस जिंकला; मॅच जिंकून कोण देईल विजयी सलामी?

पाकिस्तानचा कर्णधार मोहम्मद रिझवान याने नाणेफेक जिंकून घेतला पहिल्यांदा गोलंदाजी करण्याचा निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 19, 2025 14:44 IST

Open in App

ICC Champions Trophy, 2025  Pakistan vs New Zealand 1st Match : पाकिस्तान विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातील सलामी लढतीनं आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीच्या नवव्या हंगामाला शुभारंभ होत आहे. कराची येथील नॅशनल स्टेडियमवर रंगलेल्या सामन्यात पाकिस्तानचा कर्णधार मोहम्मद रिझवान याने नाणेफेक जिंकून पहिल्यांदा गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. 

'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा! 

न्यूझीलंडचा संघ मोठ्या आत्मविश्वासानं उतरेल मैदानात, कारण...

चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेआधी  मिचेल सँटनरच्या नेतृत्वाखालील न्यूझीलंडच्या संघानं पाकिस्तानमध्ये मैदान गाजवलं आहे. तिरंगी मालिका जिंकून न्यूझीलंडचा संघ चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेसाठी मैदानात उतरलाय.  सलामीच्या लढतीत यजमानांसमोर टार्गेट सेट करताना या गोष्टीचा किवी संघाला निश्चितच फायदा होईल.  

पाकिस्तान संघाची प्लेइंग इलेव्हन

फखर झमान, बाबर आझम, सौद शकील, मोहम्मद रिझवान (कर्णधार), सलमान आगा, तय्यब ताहिर, खुशदिल शाह, शाहीन आफ्रिदी, नसीम शाह, हॅरिस राउफ, अबरार अहमद.

न्यूझीलंडचा संघ डेवॉन कॉन्वे, विल यंग, ​​केन विलियम्सन, डॅरिल मिचेल, टॉम लॅथम (विकेटकीपर), ग्लेन फिलिप्स, मायकेल ब्रेसवेल, मिचेल सँटनर (कर्णधार), नॅथन स्मिथ, मॅट हेन्री, विल्यम ओ'रोर्क 

 

टॅग्स :चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५पाकिस्तानन्यूझीलंडकेन विलियम्सनबाबर आजम