Virat Kohli Record: भारतीय क्रिकेट संघातील स्टार खेळाडू विराट कोहलीनं पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यात बॅटिंगला मैदानात उतरण्याआधी फिल्डिंग वेळी मोठा पराक्रम केला. त्याने मोहम्मद अझरुद्दीनचा २५ वर्षांपासून अबाधित असलेला विक्रम मोडीत काढत नवा विक्रम प्रस्थापित केल्याचे पाहायला मिळाले. वनडेत सर्वाधिक झेल घेण्यासह कोहलीनं खास विक्रमाला गवसणी घातलीये. एक नजर टाकुयात किंग कोहलीनं सेट केलेल्या नव्या रेकॉर्ड्सबद्दल
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
किंग कोहलीच्या नावे झाला भारताकडून वनडेत सर्वाधिक झेल टिपण्याचा विक्रम
पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यात विराट कोहलीनं कुलदीप यादवच्या गोलंदाजीवर नसीम शाहचा झेल टिपला. या झेलसह वनडेत भारताकडून सर्वाधिक झेल टिपण्याचा विक्रम हा विराट कोहलीच्या नावे झाला आहे.विराट कोहलीनं २९९ सामन्यातील १५७ झेलसह मोहम्मद अझरुद्दीनला मागे टाकले आहे. भारताकडून वनडेत सर्वाधिक झेलचा विक्रम आता कोहलीच्या नावे झाला आहे.
वनडेत सर्वाधिक झेल कुणाच्या नावे? वनडे क्रिकेटमध्ये सर्वाधिक झेल टिपण्याचा विश्व विक्रम श्रीलंकेच्या महेला जयवर्धनेच्या नावे आहे. त्याने ४४८ सामन्यात २१८ झेल घेतले आहेत. त्यानंतर या यादीत रिकी पाँटिंगचा नंबर लागतो. त्याने ३७५ वनडेत १६० झेल टिपले आहेत. त्यानंतर तिसऱ्या क्रमांकावर मोहम्मद अझरुद्दीनचा नंबर लागत होता. अझरुद्दीन याने आपल्या कारकिर्दीतील ३३४ वनडेत १५६ झेल टिपले होते.
आता पाँटिंगच्या विक्रमावर असतील कोहलीच्या नजरा
चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत विराट कोहलीकडे आता रिकी पाँटिंगला ओव्हरटेक करण्याची संधी आहे. यासाठी त्याला फक्त चार झेल टिपायचे आहेत. जर त्याने हा पराक्रम केला तर वनडेत सर्वाधिक झेल टिपणाऱ्या खेळाडूंच्या यादीत तो दुसऱ्या क्रमांकावर विराजमान होऊ शकतो.