चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेतील दुबईच्या मैदानात रंगलेल्या हायहोल्टेज लढतीत भारतीय संघानं सुरुवातीच्या षटकातच पाकिस्तानच्या सलामी जोडीला तंबूचा रस्ता दाखवत सामन्यावर पकड मिळवली. पण पहिल्या दोन विकेट गमावलेल्या पाकिस्तानच्या संघानं त्यानंतर दमदार कमबॅक केल्याचे पाहायला मिळाले. १० व्या षटकात पाकिस्तानच्या संघानं ४७ धावांवर दोन विकेट्स गमावल्या होत्या. पण त्यानंतर कर्णधार मोहम्मद रिझवान आणि सौद शकील जोडी जमली अन् ही जोडी फोडणार कोण? असा प्रश्न निर्माण झाला. अक्षर पटेल आणि हार्दिक पांड्यानं या प्रश्नाच उत्तर दिलं. अक्षरनं सेट झालेल्या मोहम्मद रिझवानला क्लीन बोल्ड केले. त्यानंतर दुसऱ्याच षटकात हार्दिक पांड्यानं सौद शकीलची शिकार केली.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
सेट झालेल्या दोघांनी कॅच सुटल्यावर फेकली विकेट; अक्षर-हार्दिकनं संघाला मिळवून दिलं यश
सलामी जोडी स्वस्तात आटोपल्यावर मोहम्मद रिझवान आणि सौद शकील जोडीनं तिसऱ्या विकेटसाठी १०४ धावांची दमदार भागीदारी रचली. पाकिस्तानच्या षटकातील ३३ व्या षटकात हार्दिक पांड्याच्या गोलंदाजीवर मोहम्मद रिझवान याने एक मोठा फटका खेळला. पण हर्षित राणानं कॅचसह त्याची विकेट घेण्याची संधी गमावली. सुटलेला हा कॅच टीम इंडियासाठी महागडा ठरणार का? असं वाटत असताना अक्षर पटेलनं काम सोपे केले. पुढच्याच षटकात मोहम्मद रिझवानला त्याने क्लीन बोल्ड केले. तो ७७ चेंडूत ४६ धावा करून बाद झाला.
अक्षर पटेलच्या याच षटकात सौद शकीलचाही एक कॅचही सुटला. कुलदीपनं प्रयत्न केला पण तो कमी पडला. मग पुढच्या षटकात हार्दिक पांड्याने त्याला तंबूचा रस्ता दाखवला. पांड्याच्या गोलंदाजीवर उत्तुंग फटका खेळण्याच्या नादात सौद शकीनं अक्षर पटेलच्या हाती झेल दिला. तो ७६ चेंडूत ६२ धावा करून माघारी फिरला. एक विकेट आल्यावर एक विकेट येते, हे चित्र क्रिकेटच्या मैदानात नेहमीच पाहायला मिळते. जड्डूनं तय्यब ताहिरच्या विकेटसह यात आणखी एका विकेटची भर घातली.
Web Title: ICC Champions Trophy 2025 Pakistan vs India Mohammad Rizwan misses out on half century after Axar Patel dismisses Pakistan's skipper Hardik Pandya dismissed Saud Shakeel Watch Video
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.