IND vs PAK : शाहीन शाह आफ्रिदीचा 'अनप्लेयेबल' यॉर्कर! रोहितवर आली क्लीन बोल्ड होण्याची वेळ

कडक फटकेबाजी करत होता, पण एक चेंडू असा आला जो समजण्याआधी तो क्लीन बोल्ड झाला

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 23, 2025 20:07 IST2025-02-23T19:57:16+5:302025-02-23T20:07:27+5:30

whatsapp join usJoin us
ICC Champions Trophy 2025 Pakistan vs India A brilliant yorker from Shaheen Afrid Get Wicket Of Rohit Sharma | IND vs PAK : शाहीन शाह आफ्रिदीचा 'अनप्लेयेबल' यॉर्कर! रोहितवर आली क्लीन बोल्ड होण्याची वेळ

IND vs PAK : शाहीन शाह आफ्रिदीचा 'अनप्लेयेबल' यॉर्कर! रोहितवर आली क्लीन बोल्ड होण्याची वेळ

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

दुबईच्या मैदानात रंगलेल्या  सामन्यात पाकिस्तानच्या संघानं दिलेल्या २४२ धावांचा पाठलाग करताना भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मानं संघाला जबरदस्त सुरुवात करुन दिली. शाहीन शाह आफ्रिदीच्या पहिलं षटक अगदी संयमीरित्या खेळून काढल्यावर दुसऱ्या षटकात रोहित शर्मानं नसीम शाहला धारेवर धरले. या षटकात एक चौकार अन् एक चाबुक षटकार मारल्याचे पाहायला मिळाले.  पाचव्या षटकात शाहीन शाह आफ्रिदीच्या गोलंदाजीवरही रोहितनं कडक चौकार मारला. पण त्यानंतर तो क्लीन बोल्ड झाला. शाहीन शाह आफ्रिदीनं अप्रतिम यॉर्करसह रोहित शर्माला सरप्राइज दिलं अन् रोहितला बोल्ड होऊन परतावं लागले. आउट होण्याआधी रोहित शर्मानं १५ चेंडूत ३ चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने २० धावा केल्या.    

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा! 

रोहित शर्मा लवकर बाद झाला की, तो सोशल मीडियावर ट्रोल व्हायला लागतो. पण यावेळी तो ज्या चेंडूवर बाद झाला तो चेंडू एकदम भारी अन् होता. त्यामुळे त्याची यावेळीची विकेट त्याला ट्रोल करण्यापेक्षा यॉर्कर भारी होता, असं म्हणायला लावणारी होती. अल्प धावा करून तो तंबूत परतला असला तरी त्याने छोट्या खानी खेळीसह एक टेम्पलेट सेट केले ज्यामुळे पाकिस्तानी संघातील गोलंदाजांचे खांदे पडल्याचे पाहायला मिळाले. शाहीन शाह आफ्रिदीनं अखूड टप्प्यावर गोलंदाजी करता करता अप्रतिम यॉर्कर टाकत रोहितची विकेट आपल्या खात्यात जमा केली.  

'आउट' होण्याआधी डोळ्याचं पारण फेडणारी फटकेबाजी, सिक्सरवर रितिकाने वाजवल्या टाळ्या

रोहित शर्मानं नसीम शाहच्या गोलंदाजीवर मारलेला सिक्सर अप्रतिम असाच होता. त्याच्या भात्यातून निघालेला हा सुरेख फटका दुबईत स्टँडमध्ये बसलेल्या प्रेक्षकांसह टेलिव्हिजन आणि मोबाईलवर सामन्याचा आनंद घेणाऱ्या क्रिकेट चाहत्यांच्या डोळ्याचे पारणं फेडणारा असा होता. यावेळी रोहितची पत्नी रितिकाची खास झलकही स्टँडमध्ये पाहायला मिळाली. नवरोबाच्या सिक्सरला तिने टाळ्या वाजवून दाद दिली. तिच्यासह सूर्यकुमार यादव त्याची पत्नी आणि तिलक वर्मा आणि अभिषेक शर्मा हे स्टार क्रिकेटरही सामना पाहण्यासाठी दुबईत उपस्थितीत असल्याचे पाहायला मिळाले.

 

 

 

Web Title: ICC Champions Trophy 2025 Pakistan vs India A brilliant yorker from Shaheen Afrid Get Wicket Of Rohit Sharma

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.