Pakistan vs India : दुबईच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर भारत-पाक यांच्यातील हायहोल्टेज सामना रंगला आहे. चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेतील आव्हान टिकवून ठेवण्यासाठी पाकिस्तानसाठी ही 'करो वा मरो' अशी लढाई आहे. दुसरीकडे भारतीय संघ सेमी फायनलचं तिकीट पक्के करण्याच्या इराद्याने मैदानात उतरेल. यामागचे कारण पाकिस्तानच्या संघाला सलामीच्या लढतीत न्यूझीलंडकडून पराभवाचा सामना करावा लागला होता. तर भारतीय संघानं बांगलादेश विरुद्धच्या सामन्यातील विजयासह मालिकेत विजयी सलामी दिली होती. पाकिस्तान संघाचा कर्णधार मोहम्मद रिझवान याने टॉस जिंकून पहिल्यांदा फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ कोणत्याही बदलाशिवाय मैदानात उतरला आहे. याचा अर्थ बांगलादेशविरुद्च्या सामन्यात जी प्लेइंग इलेव्हन होती तिच कायम आहे. दुसरीकडे पाकिस्तानचा संघ एका बदलासह मैदानात उतरलाय. फखर झमान दुखापतीमुळे स्पर्धेबाहेर पडला असून त्याच्या जागी इमाम उल हकची पाक संघात एन्ट्री झालीये.
भारतीय संघाची प्लेइंग इलेव्हन :
रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, अक्षर पटेल, केएल राहुल (विकेटकीपर), हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, हर्षित राणा, मोहम्मद शमी, कुलदीप यादव.
पाकिस्तान प्लेइंग इलेव्हन : इमाम-उल-हक, बाबर आझम, सौद शकील, मोहम्मद रिझवान (कर्णधार), सलमान आगा, तय्यब ताहिर, खुशदिल शाह, शाहीन आफ्रिदी, नसीम शाह, हॅरिस राउफ, अबरार अहमद.