भारत विरुद्ध बांगलादेश यांच्यात आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेतील दुसरी लढत रंगली आहे. दुबईच्या आंतरारष्ट्रीय स्टेडियमवर रंगलेल्या सामन्यात बांगालेशचा कर्णधार नजमुल हुसेन शांतो याने नाणेफेक जिंकून पहिल्यांदा फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे या स्पर्धेतील पहिल्या सामन्यात भारतीय संघ धावांचा पाठलाग करताना दिसणार आहे. भारतीय संघानं पहिल्या सामन्यात जलदगती गोलंदाजीमध्ये अर्शदीप सिंग ऐवजी मोहम्मद शमी आणि हर्षित राणा तर फिरकीच्या रुपात कुलदीप यादवला प्लेइंग इलेव्हनमध्ये पहिली पसंती देण्यात आलीये.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
टीम इंडियाची प्लेइंग इलेव्हन
रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (विकेटकीपर), हार्दिक पांड्या, अक्षर पटेल, रवींद्र जडेजा, हर्षित राणा, मोहम्मद शमी, कुलदीप यादव.
बांगलादेशची प्लेइंग इलेव्हन
तन्झीद हसन, सौम्या सरकार, नजमुल हुसेन शांतो (कर्णधार), तौहिद हृदयॉय, मुशफिकुर रहीम (यष्टीरक्षक), मेहदी हसन मिराज, जाकेर अली, रिशाद हुसेन, तन्झीम हसन साकिब, तस्किन अहमद, मुस्तफिजुर रहमान.