बुकींच्या माहेरघरात भारत-पाकिस्तान मॅच ठरली कलरफूल, नागपुरातून १२०० कोटींची लगवाडी

ICC Champions Trophy 2025, Ind Vs Pak: क्रिकेट जगतातील सर्वात जास्त रोमांचक ठरणाऱ्या भारत - पाकिस्तान क्रिकेट संघा दरम्यानची हाय व्होल्टेज मॅच आज बुकींच्या माहेरघरात पार पडली. वारंवार कलर बदलविणाऱ्या या मॅचवर नागपूर-विदर्भातील सटोड्यांनी १२०० कोटींच्या सट्ट्याची खयवाडी-लगवाडी केल्याची माहिती आहे.

By नरेश डोंगरे | Updated: February 23, 2025 22:33 IST2025-02-23T22:33:06+5:302025-02-23T22:33:37+5:30

whatsapp join usJoin us
ICC Champions Trophy 2025, Ind Vs Pak: India-Pakistan match turned out to be colorful in the bookies' house, 1200 crores of betting from Nagpur | बुकींच्या माहेरघरात भारत-पाकिस्तान मॅच ठरली कलरफूल, नागपुरातून १२०० कोटींची लगवाडी

बुकींच्या माहेरघरात भारत-पाकिस्तान मॅच ठरली कलरफूल, नागपुरातून १२०० कोटींची लगवाडी

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

- नरेश डोंगरे
नागपूर  -  क्रिकेट जगतातील सर्वात जास्त रोमांचक ठरणाऱ्या भारत - पाकिस्तान क्रिकेट संघा दरम्यानची हाय व्होल्टेज मॅच आज बुकींच्या माहेरघरात पार पडली. वारंवार कलर बदलविणाऱ्या या मॅचवर नागपूर-विदर्भातील सटोड्यांनी १२०० कोटींच्या सट्ट्याची खयवाडी-लगवाडी केल्याची माहिती आहे.

सेंट्रल इंडियाच्या बुकी बाजाराचे मुख्य सेंटर म्हणून नागपूरचे नाव बुकी बाजारात फेमस आहे. देश-विदेशातील अनेक बड्या बुकींसोबतच येथील बुकीदेखिल थेट दुबईशी कनेक्ट आहेत. त्यामुळे सट्टेबाजांचे माहेरघर म्हणूनही बुकीबाजारात दुबईची ओळख आहे. त्यांची भोपाळ, इंदोर, रायपूर, जबलपूर, हैदराबादसोबत सट्ट्याची लाईन जुळली असून, प्रत्येक आंतराष्ट्रीय क्रिकेट मॅचमधून ते कोट्यवधींची लगवाडी-खयवाडी करतात. भारत-पाकिस्तानदरम्यानच्या क्रिकेट सामन्यासाठी शेकडो कोटींचे डाव लागत असल्याने येथील बुकी विशेष पद्धतीने खयवाडीची तयारी करतात. यावेळी त्यांनी अनेक व्हॉटसअप ग्रुप आणि टेलिग्राम चॅनलचा खयवाडीसाठी वापर केला.

नागपुरातील बहुतांश मोठे बुकी दुबईत बसले आहेत. आज क्रिकेट विश्वातील खास आकर्षण असलेल्या भारत-पाकिस्तान दरम्यानची मॅच दुबईतच असल्याने त्यांच्या पंटर्सनी विशेष तयारी करून ठेवली होती. मॅचपूर्वी भारताचा भाव ४०-४२ तर पाकिस्तानचा भाव ५५ पैशांवर ठेवला होता. त्यामुळे या मॅचवर दणकून सट्टेबाजी झाली.

पाच ओव्हरनंतर कलर बदलला
पहिल्या इनिंगच्या पाच ओव्हरनंतर मॅचचे अंदाज डळमळीत झाल्याने बुकींनी कलर बदलून पाकिस्तानचा भाव कमी केला. (वारंवार मॅचचे पारडे बदलत असल्यास त्याला बुकी कलर बदलणे म्हणतात.) सात गडी बाद झाल्यानंतर पुन्हा भाव भारताच्या पारड्यात गेला. मात्र, पहिल्या सत्राच्या अखेरीस आणि दुसऱ्या ईनिंगमध्ये रोहित शर्मा आऊट झाल्यानंतर पुन्हा बुकींनी रंग बदलले. 

सट्ट्याची नवी फंडेबाजी
क्रिकेटचा सट्टा आधी 'लगाया खाया' म्हणून मोबाईल कॉल्सवर घेतला जायचा.आता मात्र अॅप्स तसेच ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरून घेतला जातो. पोलिसांना या अप्स आणि वेबसाईटची माहिती होईस्तोवर सट्टेबाज नवा फंडा शोधून लगवाडी-खयवाडी करतात.

पाकिस्तानकडे गेलेले सट्टेबाज कंगाल
आजच्या मॅचमध्ये पाकिस्तानच्या बाजुने लगवाडी करणारे हजारो सट्टेबाज अक्षरश: कंगाल झाले. शेवटचे १० ओव्हर शिल्लक असताना बुकींनी भारताचा भाव केवळ ५ पैसे ठेवला. त्यामुळे लाखो रुपये हरणाऱ्या हजारो सट्टेबाजांनी मॅचसंपण्यापूर्वीच स्वत:ला पेल्यात बुडवून घेतले.
--------------

Web Title: ICC Champions Trophy 2025, Ind Vs Pak: India-Pakistan match turned out to be colorful in the bookies' house, 1200 crores of betting from Nagpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.