चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेतील साखळी फेरीतील अखेरच्या सामन्यात भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मानं पुन्हा एकदा टॉस गमावला आहे. सलग तेरा वेळा टॉस गमावण्याचा रेकॉर्ड आता टीम इंडियाच्या नावे झाला आहे. यावेळी टॉस गमावला असला तरी टीम इंडिया पहिल्यांदा बॅटिंग करताना दिसणार आहे. कारण न्यूझीलंड कर्णधार मिचेल सँटनर याने नाणेफेक जिंकल्यावर पहिल्यांदा गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. भारतीय संघ मागील दोन सामन्यात धावांचा पाठलाग करताना दिसला होता. यावेळी टीम इंडिया न्यूझीलंडसमोर टार्गेट सेट करताना दिसतील.
वरुण चक्रवर्तीला संधी
चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत अखेर भारतीय संघानं पहिल्या दोन मॅचमध्ये बाकावर बसवलेल्या वरुण चक्रवर्तीला प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी दिली आहे. हार्दिक पांड्यावर भरवसा ठेवून हर्षित राणाला बाहेर बसवत भारतीय संघात अतिरिक्त फिरकीपटूला संघात स्थान दिल्याचे दिसते. वरुण चक्रवर्ती पदार्पणाच्या आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत कशी कामगिरी करणार ते पाहण्याजोगे असेल.
विराट कोहलीचा ३०० वा सामना
विराट कोहलीवरही साऱ्यांच्या नजरा असतील. कारण आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये तो ३०० वा वनडे सामना खेळण्यासाठी मैदानात उतरणार आहे. पाकिस्तान विरुद्धच्या शतकी खेळीसह कोहली रंगात आला असून न्यूझीलंडच्या गोलंदाजांचा तो समाचार घेऊन ३०० वा वनडे सामना खास करणार का? यावरही क्रिकेट चाहत्यांच्या नजरा असतील.
दोन्ही वेळा टॉस गमावून चेस केला
भारतीय संघाची प्लेइंग इलेव्हन- रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, अक्षर पटेल, केएल राहुल (विकेटकीपर), हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, मोहम्मद शमी, कुलदीप यादव, वरुण चक्रवर्ती.
न्यूझीलंड प्लेइंग इलेव्हन : विल यंग, रचिन रविंद्र, केन विल्यमसन, डॅरिल मिशेल, टॉम लॅथम (विकेटकीपर), ग्लेन फिलिप्स, मायकेल ब्रेसवेल, मिशेल सँटनर (कर्णधार), मॅट हेन्री, काइल जेमिसन, विल्यम ओ'रोर्क