बांगलादेशविरुद्ध गुरुवारी खेळल्या गेलेल्या चॅम्पियन्स ट्रॉफी सामन्यात टीम इंडियाचा यष्टीरक्षक केएल राहुलकडून मोठी चूक झाली. यामुळे स्टार क्रिकेटर विराट कोहलीचाही पारा चढला. विराट कोहली स्वतःवर नियंत्रण ठेवू शकला नाही आणि त्याने जाहीरपणे आपली भडास अथवा राग व्यक्त केला. विराट कोहलीचा हा राग अगदी कॅमेऱ्यांपासूनही सुटू शकला नाही. विराट कोहलीचा हा व्हिडिओ सोशल मीडियावरही जबरदस्त व्हायरल होत आहे.
केएल राहुलकडून सामना सुरू असताना चूक - खरे तर, ही घटना बांगलादेश विरुद्धच्या सामन्यात 23व्या ओव्हरमध्ये घडली. या ओव्हरच्या पहिल्याच चेंडूवर केएल राहुलने स्टंपिंगची एक सोपी संधी सोडली आणि बांगलादाशचा फलंदाज जेकर अलीला जीवनदान मिळाले. जर केएल राहुलने हे स्टंपिंग केले असते, तर जेकर अली 24 धावांवरच तंबुत परतला असता. यानंतर जेकर अलीने 68 धावांची केळी केली. तौहीद हृदोयसोबत जेकर अलीने सहाव्या विकेटसाठी 154 धावांची पार्टनरशिप केली.
...अन् स्टार क्रिकेटर विराट कोहली संतापला -केएल राहुलने जेक अलीला स्टंप आउट करण्याची संधी गमावल्याने स्टार क्रिकेटर विराट कोहली संतापला. तो अत्यंत अस्वस्थ दिसून आला. तो रागात काही तरी पुटपुटल्याचेही कॅमेऱ्यात कैद झाले. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर जबरदस्त व्हायरल होत आहे. यामुळे, केएल राहुलच्या विकेटकीपिंगवर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. कारण तो चेंडू पकडू शकला नाही आणि परिणामी भारताची स्टंपिंगची संधी हुकली.