चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ स्पर्धेत भारतीय संघानं धमाकेदार सुरुवात केली आहे. पाकिस्तानसह पहिल्या दोन सामन्यातील दमदार विजयासह टीम इंडिया आपल्या गटात अव्वलस्थानावर आहे. सेमी फायनलमध्ये आधी टीम इंडिया न्यूझीलंड विरुद्ध साखळी फेरीतील अखेरचा सामना खेळणार आहे. या सामन्यासाठी मैदानात उतरण्याआधी टीम इंडियातील स्टार खेळाडूंचा एक खास अन् मजेदार व्हिडिओ समोर आला आहे. यात भारतीय क्रिकेट संघातील कोणत्या खेळाडूनं आपल्या मोबाईलमध्ये कुणाचा फोटो वॉलपेपरच्या रुपात ठेवलाय? मोबाईल प्लेलिस्टमध्ये कोण कोणत्या साँगला पसंती देते? याशिवाय क्रिकेटर्सच्या लास्ट कॉल डिटेल्सची गोष्ट समोर आलीये.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
साहिबा बालीसोबत गप्पा गोष्टी करताना दिसले टीम इंडियातील स्टार क्रिकेटर
स्टार स्पोर्टसने आपल्या अधिकृत सोशल मीडियावर एक खास अन् मजेदार व्हिडिओ शेअर केलाय. यात साहिबा बाली भारतीय क्रिकेटर्सच्या मोबाईल फोनमधील गोष्टींच गुपित उघड करताना पाहायला मिळते. यात हार्दिक पांड्यासह मोहम्मद शमी, श्रेयस अय्यर आणि रवींद्र जडेजाची झलक पाहायला मिळते.
कुणाच्या मोबाईल वॉलपेपरवर कुणाचा फोटो?
या व्हिडिओमध्ये स्टार स्पोर्ट्सची अँकर साहिबा बाली क्रिकेटर्सला त्यांच्या मोबाईलसंदर्भात काही मजेशीर प्रश्न विचारतान दिसते. यात कुणी आपल्या वॉलपेपरवर कोणाचा फोटो ठेवलाय हा प्रश्न तिने जवळपास सर्वांनाच विचारला. यात जड्डूनं आपला फोन दाखवत माझ्या वॉलपेपरवर काहीच नाही ते दाखवले. शमीनं आपल्या लेकीचा तर श्रेयस अय्यरनं आपल्या मोबाईलमध्ये आईसोबत लहानपनीचा आपला फोटो ठेवल्याचे दाखवले. हार्दिक पांड्यानं मुलगा अगस्त्यासोबत फोटो वॉलपेपरला लावल्याचे दिसून आले.
चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेदरम्यान पांड्याची 'हनुमान चालीसा' ऐकण्याला पसंती
या खास शोमध्ये साहिबा बालीनं भारतीय संघातील स्टार क्रिकेटपटूंना मोबाईल प्लेलिस्टमध्ये सर्वाधिक वेळा वाजवलेले गाणं कोणते? हा प्रश्नही विचारल्याचे पाहायला मिळते. या प्रश्नावर हार्दिक पांड्याचं उत्तर एकदम खास अन् सरप्रायजिंग असेच होते. हार्दिक पांड्याकडे पाहिल्यावर तो मोकळ्या वेळेत पार्टी साँगच ऐकत असेल, असे कुणालाही वाटेल. पण चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेदरम्यान हार्दिक पांड्या हनुमान चालीसा ऐकण्याला पसंती देत आहे. स्वत: त्याने ही गोष्ट सांगितली आहे.
Web Title: ICC Champions Trophy 2025 Hardik Pandya plays Hanuman Chalisa In His Phone Iyer Jadeja Shami Show Mobile Wallpaper To Star Sports Anchor Sahiba Bali Watch Video
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.