Join us

AUS vs ENG :ऑस्ट्रेलियन कॅप्टन स्मिथनं टॉस जिंकून घेतली बॉलिंग; इंग्लंड सेट करणार टार्गेट

जर ही लढाई ३०० पारची झाली तर...

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 22, 2025 14:18 IST

Open in App

चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेतील ऑस्ट्रेलिया विरुद्ध इंग्लंड यांच्यातील 'ब' गटातील दुसरी लढत लाहोरच्या गद्दाफी स्टेडियमवर खेळवण्यात येत आहे. या सामन्यात ऑस्ट्रेलियन संघाचा कर्णधार स्टीव्ह स्मिथ याने नाणेफेक जिंकून पहिल्यांदा गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. जोस बटलरच्या नेतृत्वाखालील संघ पहिल्यांदा बॅटिंग करताना किती धावांचे टार्गेट सेट करणार ते पाहण्याजोगे असेल.

'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा! 

इंग्लंडचा संघ तगड्या बॅटिंग लाइनअपसह मैदानात उतलाय. जर त्यांनी ही लढाई ३०० पार धावसंख्येची केली तर ऑस्ट्रेलियाचा पहिल्यांदा गोलंदाजी करण्याचा निर्णय फसवा ठरू शकतो. दुखापतीमुळे अनेक स्टार खेळाडू संघाबाहेर असताना कांगारूंचा ताफा कशा पद्धतीने कामगिरी करतोय यावरही सर्वांच्या नजरा असतील.

इंग्लंडची प्लेइंग इलेव्हन

फिलिप सॉल्ट, बेन डकेट, जेमी स्मिथ (विकेटकीपर), जो रूट, हॅरी ब्रूक, जोस बटलर (कर्णधार), लियाम लिविंगस्टोन, ब्रायडन कार्स, जोफ्रा आर्चर, आदिल रशीद, मार्क वूड. 

ऑस्ट्रेलियन प्लेइंग इलेव्हन: 

मॅथ्यू शॉर्ट, ट्रॅव्हिस हेड, स्टीव्हन स्मिथ (कर्णधार), मार्नस लाबुशेन, जोश इंग्लिस (यष्टीरक्षक), अ‍ॅलेक्स केरी, ग्लेन मॅक्सवेल, बेन द्वारशुइस, नॅथन एलिस, अ‍ॅडम झांपा, स्पेन्सर जॉन्सन.

टॅग्स :चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५आॅस्ट्रेलियाइंग्लंड