डोन्ट व्हरी आय एम 'कॅरी'! अ‍ॅलेक्सनं हवेत उडी मारुन एका हातात पकडलेला झेल बघाच (VIDEO)

 अ‍ॅलेक्स कॅरी सुपरमॅन झाला. त्याने हवेत उडी मारत एका हातात अविश्वसनिय असा झेल पकडत सॉल्टच्या खेळीला ब्रेक लावला. 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 22, 2025 16:57 IST2025-02-22T16:54:17+5:302025-02-22T16:57:11+5:30

whatsapp join usJoin us
ICC Champions Trophy 2025 Alex Carey Pulls Off Stunning One Handed Catch To Dismiss Phil Salt During AUS vs ENG Match Watch Video | डोन्ट व्हरी आय एम 'कॅरी'! अ‍ॅलेक्सनं हवेत उडी मारुन एका हातात पकडलेला झेल बघाच (VIDEO)

डोन्ट व्हरी आय एम 'कॅरी'! अ‍ॅलेक्सनं हवेत उडी मारुन एका हातात पकडलेला झेल बघाच (VIDEO)

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

अ‍ॅशेस मालिकेतील दोन कट्टर प्रतिस्पर्धी ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड या दोन संघांनी एकमेकांविरुद्धच्या लढतीनं चॅम्पियन्स ट्रॉफीच्या यंदाच्या हंगामाची सुरुवात केलीये. पाकिस्तानमधील लाहोर येथील गद्दाफी स्टेडियमवर या दोन संघातील सामना रंगल्याचे पाहायला मिळाले. या सामन्यात ऑस्ट्रेलियन कर्णधार स्टीव्ह स्मिथने नाणेफेक जिंकून जिंकून जोस बटलरच्या नेतृत्वाखालील इंग्लंडच्या संघाला पहिल्यांदा फलंदाजीला बोलावलं. 

'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा! 

इंग्लंडची सलामी जोडी काहीक्षणात फुटली!

भारतीय मैदानात चारीमुंड्याचित झालेला इंग्लंडचा संघ दुखापतग्रस्त कांगारुंविरुद्धच्या सामन्यात कशी कामगिरी करणार, अशी चर्चा क्रिकेट वर्तुळात रंगली होती. चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेआधी भारताविरुद्धच्या सामन्यात इंग्लंडचा संघ फ्लॉप ठरला असला सलामी जोडीनं संघाला चांगली सुरुवात करून दिल्याचे पाहायला मिळाले होते. पण ऑस्ट्रेलिया विरुद्ध मात्र अवघ्या १३ धावांवर इंग्लंडची सलामी जोडी फुटली. अ‍ॅलेक्स कॅरीच्या जबरदस्त क्षेत्ररक्षणामुळे सॉल्टची खेळी अळणी ठरली. फिलिप सॉल्ट ६ चेंडूत १० धावा करून तंबूत परतला. त्याची विकेट बेन ड्वॉरशुइस (Ben Dwarshuis) या गोलंदाजाच्या खात्यात पडली असली तरी या विकेटच सर्व श्रेय जाते ते कॅरीनं टिपलेल्या अफलातून झेलला.

अ‍ॅलेक्स कॅरीचा सुपरमॅन अवतार, हवेत उडी मारत एका हातात पकडला झेल 

 

बेन ड्वॉरशुइस याने सॉल्टची लेग स्टंप धरून १३०.५ kph वेगाने चेंडू फेकला होता. सॉल्टनं व्हाइट मिडऑनच्या दिशेनं जोरदार फटका खेळला. हा चेंडू बॅटरच्या खात्यात चार धावा अगदी सहज जमा करुन जाईल, असे वाटत होते. पण मिडऑनवर क्षेत्ररक्षणासाठी उभ्या असलेल्या  अ‍ॅलेक्स कॅरी सुपरमॅन झाला. त्याने हवेत उडी मारत एका हातात अविश्वसनिय असा झेल पकडत सॉल्टच्या खेळीला ब्रेक लावला. 

दुसरा कॅचही त्याच्याच हाती

फिल सॉल्टची जागा घेण्यासाठी आलेल्या  जेमी स्मिथलाही फार काळ मैदानात टिकता आले नाही. त्याची विकेटही बेन ड्वॉरशुइसच्या खात्यातच जमा झाली. यावेळीही कॅच घेणारा खेळाडू होता तो कॅरी.  अ‍ॅलेक्स कॅरी हा एक विकेट किपर बॅटर आहे. पण इंग्लंड विरुद्धच्या सामन्यात जोश इंग्लिश याला ऑस्ट्रेलियाने विकेट किपर बॅटरच्या रुपात खेळवल्यामुळे इतरवेळी यष्टीमागे दिसणारा कॅरी अन्य फिल्ड पोझिशनवर फिल्डिंग करताना दिसले. पण इथंही त्याने यष्टीमागची लवचिकता दाखवून देत संघाला महत्त्वपूर्ण यश मिळवून देण्यात दाखवली.

Web Title: ICC Champions Trophy 2025 Alex Carey Pulls Off Stunning One Handed Catch To Dismiss Phil Salt During AUS vs ENG Match Watch Video

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.